जब्बारटोला येथे भगवान बिरसा मुंडा स्मृती दिनानिमित्त आरोग्य शिबिर

0
17

, 152 नागरिकांनी घेतला लाभ
अर्जुनी मोरगाव-आरोग्य विभाग धाबे पवनी व पोलीस विभाग नवेगाव बांध यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील जब्बरटोला येथे भगवान बिरसा मुंडा स्मृतिदिन निमित्ताने आदिवासीबहुल भागात नागरिकांचे आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.बुधवार 9 जून रोजी झालेल्या या आरोग्य शिबिराचा 152 नागरिकांनी लाभ घेतला.
शिबिरात नागरिकांना पावसाळ्यात उध्दभवणारे मलेरिया, डेंगू सारख्या रोगांवर मार्गदर्शन आणि तपासणी करण्यात आली.बीपी ,शुगर तपासणी करुन मोफत औषधोपचार करण्यात आले.उपस्थितांचि कोरोना चाचणी करून मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन माल्यार्पण करून करण्यात आली .प्राथमिक आरोग्य केंद्र धाबेपवणीचे डॉ.आनंद पाटील यांच्या नेतृत्वात प्राथमिक आरोग्य केंद्र चांन्ना बाक्तीचे डॉ.कुंदन कुलसुंगे,राष्ट्रीय वैद्यकीय फिरते पथकाचे डॉ.आनंद कुकडे यांनी उपस्थित नागरिकांच्या तपासण्या करून त्यांच्यावर औषधोपचार केला.यावेळी नवेगावबांध पोलीस ठाण्याचे कर्मचारी ,आरोग्य विभागाचे कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.