
भंडारा,दि.10:- शैक्षणिक सत्र 2020-21 मध्ये इयत्ता 12 वी विज्ञान शाखेत उर्त्तीण झालेले विद्यार्थी ज्यांनी इयत्ता 12 वी विज्ञान शाखेत शिकत असतांना जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे अर्ज सादर केलेला नाही. परंतु शैक्षणिक सत्र 2021-22 मध्ये व्यावसायीक अभ्यासक्रमात राखीव प्रवर्गातून प्रवेश घेऊ इच्छितात, असे विद्यार्थी व व्यावसायीक अभ्यासक्रमात थेट व्दितीय वर्षात राखीव प्रवर्गातून प्रवेश घेऊ इच्छिणारे विद्यार्थी जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी अर्ज समितीकडे दाखल करु शकतात. तरी विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर अर्ज समितीकडे सादर करावा, असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त तथा सदस्य आर. डी. आत्राम यांनी केले आहे.
वरील विद्यार्थ्यांनी जात प्रमाणपत्र पडताळणी अर्जासोबत राज्य सामाईक प्रवेश परिक्षेस बसल्याचे प्रवेशपत्र, निकाली प्रत, महाविद्यालय वाटप (अलॉट) केल्याचे (अलॉटमेंट लेटर) वाटप पत्र, जात प्रमाणपत्र व जाती दावा सिध्द करणारे शालेय व महसुली पुरावे अर्जासोबत सादर करणे बंधनकारक असणार आहे.
00000