कोविड संकटग्रस्तांना वस्तूंचे वाटप

0
47

देवरी,दि.10-कोविड संक्रमणामुळे बाधित होऊन आधारवड हरवलेल्या कुटुंबांना देवरी तालुक्यातील चार गावात आवश्यक वस्तूंचे वाटप आज (दि.10) रोजी करण्यात आले.

देशात सर्वत्र कोविडच्या संक्रमणामुळे अनेक कुटुंबाचे आधारवड असलेले घरातील कर्ता पुरुष गमावण्याची दुर्दैवीवेळ अनेक कुटुंबांवर आली. यामध्ये गोंदिया जिल्ह्यातील 693 कुटुंबांचा समावेश आहे. या संकटामुळे अनेक बालके अनाथ झाली असून अनेक कुटुंबांवर घरातील कमावती व्यक्ती गेल्याने कुटुंबाच्या उदरभरणाचा प्रश्न निर्माण झाला होता. यामुळे गोंदिया जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राजेश खवले यांनी जिल्ह्यातील दानशूर व्यक्तींसह प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी आणि इतर संस्थांना अशा बाधित कुटूंबाना जमेल ते साहाय्य करण्याचे आवाहन केले होते.

जिल्हाधिकारी खवले यांच्या हाकेला ओ देत देवरी तालुक्यातील चार गावात कोरोनामुळे दगावलेल्या चार कुटुंबांना साहाय्य करण्यात आले. यामध्ये ओवारा, निलज, मरामजोब आणि पिंडकेपार (गो.) येथील चार कुटुंबीयांचा समावेश आहे. या कार्यात  हरदोलीच्या तलाठी पठाण, देवरीचे तलाठी बागडे, गोटाबोडीच्या तलाठी पेंदाम यांचेसह देवरीच्या महसूल पथकाने परित्रम घेतले.