
कोसमतोंडी:-(महेंद्र टेंभरे):--सडक अर्जुनी तालुक्यातील कोसमतोंडी व मुरपार येथील कोविड-१९ कोरोना आजाराने मृत्यू पावलेल्यांचे घरी गृहभेट आपुलकीची अंतर्गत कोसमतोंडी सांजा क्र. २ चे तलाढी पिंपळे यांनी भेट देऊन तहसील कार्यालय सडक अर्जुनी मार्फत अन्नधान्याची किट व आर्थिक सहाय्य वाटप केले.
कोविड-१९ कोरोना आजाराने कोसमतोंडी येथील कोरोना आजाराने मृत्यू पावलेले मोहन मेश्राम यांचे घरी जाऊन नामे अंजीरा मोहन मेश्राम यांना तहसील कार्यालय सडक अर्जुनी मार्फत अन्नधान्याची किट व आर्थिक सहाय्य वाटप करण्यात आले.तसेच मुरपार येथील मृत व्यक्ती राजेंद्र विश्वनाथ पुसाम यांचे घरी जाऊन नामें निता राजेंद्र पुसाम यांचे संजय गांधी निराधार योजना, राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेचे अर्ज भरून लाभ देण्यास सहकार्य केले . आणि तहसील कार्यालयामार्फत अन्नधान्याची किट वाटप करण्यात आले.कोसमतोडी साजा क्र.२ चे तलाढी पिंपळे यांनी गृहभेट आपुलकीची अंतर्गत कोसमतोंडी व मुरपार येथील कोविड-१९ कोरोना आजाराने मृत्यू पावलेल्या कुटुंबाचे घरी जाऊन अन्नधान्याची किट व आर्थिक सहाय्य वाटप करून त्यांचे परीवाराची सात्वंना भेट दिली.तसेच त्यांचे संजय गांधी निराधार योजना, राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना अंतर्गत लाभ मिळण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.