
कोसमतोडी:-(महेंद्र टेंभरे):-– सडक अर्जुनी तालुक्यातील खोडशिवनी येथे आधारभूत धान खरेदी केंद्र दि. सहकारी भात गिरणी सौंदड अंतर्गत सुरू करण्यात आले.या आधारभूत धान खरेदी केंद्राचे उद्घाटन दि. सहकारी भात गिरणी संस्थेचे अध्यक्ष रमेश चु-हे यांचे हस्ते व पोलीस पाटील भृंगराज परशुरामकर यांचे अध्यक्षतेखाली करण्यात आले. दि.सहकारी भात गिरणी संस्था सौंदड खोडशिवनी येथे आधारभूत धान खरेदीचे उपकेंद्र सुरू करून या उपकेंद्राअंतर्गत खोडशिवनी व खैरी येथील शेतकऱ्यांचे धान खरेदी केले जाणार आहे.रब्बी हंगामातील ९ हजार क्विंटल धान खरेदी केले जाणार आहे.संस्थेअंतर्गत खोडशिवनी येथे उपकेंद्र सुरू झाल्याने खोडशिवनी व खैरी येथील शेतकऱ्यांना सोयीचे झाले आहे. या आधारभूत धान खरेदी उपकेंद्राअंतर्गत येथील शेतकऱ्यांचे खरीप व रब्बी हंगामातील धान खरेदी केले जाणार आहे. दि सहकारी भात गिरणी संस्था सौंदड येथे धान्य साठवणकरिता पुरेशी व्यवस्था नसल्याने खोडशिवनी येथील खाजगी शाळा व घरगुती गोडाऊन धान खरेदीसाठी उपलब्ध करून देण्यात आले.त्यामुळे येथील शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होईल.
या आधारभूत धान खरेदी केंद्राचे उद्घाटन प्रसंगी भोलानाथ कापगते,उद्वव परशुरामकर, दामोधर परशुरामकर, रामदास मस्के,पतिराम परशुरामकर,पातोडे, विठोबा पुस्तोडे तथा येथील शेतकरी उपस्थित होते.