42.4 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home गुन्हेवार्ता ग्रा.पं.कर्मचारी संजय रंगारीच्या आत्महत्या प्रकरणातील दोषींना त्वरित अटक करण्याची मागणी

ग्रा.पं.कर्मचारी संजय रंगारीच्या आत्महत्या प्रकरणातील दोषींना त्वरित अटक करण्याची मागणी

0
53

गोंदिया==ग्राम पंचायत गोसाईटोला (ता.आमगांव)येथील ग्राम पंचायत कर्मचारी संजय हिवराज रंगारी यांनी गळफास करून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.
आत्महत्या करणा-या करमचा-यांनी सुसाईड नोट मध्ये ग्रामसेवक/सरपंच व ईतरांच्या प्रताड़ने मुळे आत्महत्या करित असल्याचा ऊल्लेख असल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणाची सखोल व निष्पक्ष चोकशी होवुन दोषींना त्वरित अटक करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य ग्राम पंचायत कर्मचारी महासंघ (आयटक) चे राज्य संघटन सचिव मिलिंद गनविर यांनी पोलिस अधीक्षक गोंदिया,ग्राम विकास विभागाचे प्रधान सचिव ,गोंदिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी,व संबंधित वरिष्ठ अधिका-यांना निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.
वेळेवर वेतन भत्ता न देने,कर्मचा-यांचे मानसिक व आर्थिक शोषण करणे,सेवाशर्तीची अंमलबजावणी न करणे,घरच्या नोकरा प्रमाणे वागणुक करणे सारखे प्रकार ग्राम पंचायती मध्ये होतात या विरोधात महासंघ वेळोवेळी पाठपुरावा करणे,निवेदन देणे, वरिष्ठांना तक्रारी देणे व गरज पडल्यास आंदोलन करणे सारखे कार्यक्रमाच्या माध्यमातून करमचा-यांचा न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत असते .ग्राम सेवक व सरपंच यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करणे हि दुर्दैवी घटना आहे व या मुळे जिल्ह्यातील व राज्यातील ग्राम पंचायत कर्मचारी संतप्त झाला आहे. करमचा-यांत असंतोष पसरला आहे. वरिल प्रकरणाची सखोल व निष्पक्ष चोकशी होवुन दोषींना त्वरित अटक करण्याची मागणी मिलिंद गनविर यांनी केली आहे.

blank