42.4 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home रोजगार/व्यापार २१ ते २५ जून दरम्यान शेळी, कुक्कुटपालन व दूध व्यवसाय ऑनलाईन प्रशिक्षण

२१ ते २५ जून दरम्यान शेळी, कुक्कुटपालन व दूध व्यवसाय ऑनलाईन प्रशिक्षण

0
26

वाशिम, दि. १६ : जिल्ह्यात सुशिक्षित बेरोजगार युवक- युवती तसेच शेतीसोबत जोडधंदा करू इच्छिणार्‍या व्यक्तीसाठी जिल्हा उद्योग केंद्राच्यावतीने २१ ते २५ जून दरम्यान शेळीपालन, कुकुटपालन, गाय व म्हैस पालन करून दुग्ध व्यवसायाचे ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात येणार आहे. हे प्रशिक्षण दररोज चार तास  राहणार आहे.

सुशिक्षित बेरोजगार युवक- युवतींनी तंत्रशुद्ध प्रशिक्षण घेऊन स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरू करावा, हा या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश आहे. या प्रशिक्षणात शेळी, कुकुट, गाय, म्हैस व दूध व्यवसाय पालनाचे तंत्र प्रकार, त्यांच्या जाती, लसीकरण, संशोधन, रोग व लक्षणे, खाद्य निर्मिती व चाऱ्यांचे प्रकार, उद्योग सुरू करण्याबाबत संपूर्ण मार्गदर्शन, उद्योजकता विकास, उद्योगाच्या संधी, शासकीय योजनांची माहिती आदी बाबतची माहिती व मार्गदर्शन तज्ज्ञ वक्ते करणार आहे.

प्रशिक्षणासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवार हा किमान पाचवी पास असावा. त्याचे वय १८ ते ५० वर्षे दरम्यान असावे. प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. प्रशिक्षण नोंदणीसाठी २१ जून २०२१ पर्यंत कार्यालयीन वेळेत महाराष्ट्र महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे प्रकल्प अधिकारी डी. एस. खंदारे यांच्याशी ८८०५५५१४६२ या क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच महाराष्ट्र उद्योजकता विकास कार्यालय, दुसरा माळा, काळे कॉम्प्लेक्स, काटा रोड वाशिम येथे संपर्क साधावा, असे आवाहन विभागीय अधिकारी योगेश डफळे यांनी केले आहे.

blank