
गोंदिया,दि.17 : महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रातर्फे शेतकरी, सुशिक्षीत बेरोजगार युवक-युवतींसाठी गोंदिया
येथे पशुधनावर आधारित ऑनलाईन स्वयंरोजगार विकास प्रशिक्षण कार्यक्रम एक आठवडा कालावधीचे आयोजित
करण्यात येत आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमात पशुसंवर्धनावर आधारित ऑनलाईन स्वयंरोजगार विकास प्रशिक्षण
कार्यक्रमात शेळीपालन, कोंबडी पालन, प्राण्यांच्या विविध जाती, गोठाबांधणी, चारा व्यवस्थापन, आजार व
प्राथमिक उपचार, विमा, कार्यक्रमात प्रकल्प अहवाल, उद्योजकीय गुणसंपदा,
यशस्वी उद्योजकाचे अनुभव, आपल्या कामासाठी संपर्क, कशासाठी, कोणाकडे ? उद्योग उभारणीतील टप्पे, विविध
उद्योग संधी, सेवा उद्योग, लेदर प्रॉडक्टस, प्लास्टीक, केमिकल, कृषि प्रकिया, अन्न प्रक्रिया, इंजिनियरींग, आयात-
निर्यात, पशुधनावर आधारीत उद्योग संधी, आय.टी. क्षेत्रातील उद्योग संधी, उद्योजकीय प्रेरणा, इत्यादी विषयावर विस्तृत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच मार्केटींग
संभाषण कौशल्य, अकाऊंटींग, शासकीय योजना व अनुदानाची माहिती, बँकेची कार्यपध्दती आदी विषयावर
मार्गदर्शन करण्यात येईल. अधिक माहिती व प्रवेशासाठी महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे प्रकल्प अधिकारी संदिप
जाने, बोपचे चाळ, बालाघाट रोड, गोंदिया येथे भ्रमणध्वनी क्रमांक 9637536041 यावर संपर्क साधावा.




