
पात्र/अपात्र यादी गोंदिया जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिध्द
गोंदिया,दि.18 : जिल्हाधिकारी कार्यालयाने 3 फेब्रुवारी 2021 रोजी प्रसिध्द केलेल्या जाहिरातीनुसार
11 विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता पद भरणेकरीता इच्छुक उमेदवारांनी सर्व 62 अर्ज जिल्हाधिकारी
कार्यालयास सादर केले होते. जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे गठीत समितीद्वारे वरील 62
अर्जांची/उमेदवारांची छाननी करुन पात्र/अपात्र यादी तयार करण्यात आली आहे. यादीनुसार 36 अर्जदार
मुलाखतीसाठी पात्र ठरतात आणि 26 अर्जदार अपात्र आहेत.
मध्यंतरी कोरोना विषाणूची लाट आल्यामुळे आणि शासनाने संचारबंदी व लॉकडाऊन जाहीर
केल्यामुळे सदर यादी प्रसिध्द करुन आक्षेप मागविण्याची कार्यवाही पुढे ढकलण्यात आली होती.
जाहिरातीच्या अनुषंगाने पात्र आणि अपात्र उमेदवारांची यादी गोंदिया जिल्ह्याच्या संकेतस्थळावर
प्रसिध्द करण्यात येत आहे. तसेच याद्वारे अपात्र उमेदवारांचे आक्षेप मागविण्यात येत आहे. अपात्र ठरलेल्या
उमेदवारांनी 5 जुलै 2021 पर्यंत त्यांचे आक्षेप जिल्हाधिकारी कार्यालय गोंदिया (दंड शाखा) येथे पाठवावे
किंवा [email protected] या ई-मेलवर सादर करावे. 5 जुलै 2021 नंतर प्राप्त होणाऱ्या आक्षेपांचा
विचार करण्यात येणार नाही, याची संबंधितांनीनोंद घ्यावी. असे जिल्हादंडाधिकारी राजेश खवले यांनी
प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.
00000





