31.4 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home विदर्भ गोंदिया जिल्ह्याच्या पाॅझिटिव्हीटी रेट सर्वात कमी,जिल्हा राज्यात प्रथम

गोंदिया जिल्ह्याच्या पाॅझिटिव्हीटी रेट सर्वात कमी,जिल्हा राज्यात प्रथम

0
73

गोंदिया जिल्ह्यात आज फक्त 2 रुग्ण बाधित,जिल्हा कोरोनामुक्तीच्या वाटेवर

गोंदिया,दि.21 : राज्यात कोव्हिड-19 पॉझिटिव्हिटीचा वेग सातत्याने वाढत असून या आठवड्यात पॉझिटिव्हीटी रेट सर्वात कमी असून राज्यात गोंदिया जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे.गोंदियाचा पाॅझिटिव्हीटीचा दर हा 0.19 आहे.जलगावचा 0.68,चंद्रपूर 0.71 तर भंडारा जिल्ह्याच्या दर 0.93 आहे.  शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया येथील विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेतून आज 21 जून रोजी प्राप्त अहवालात जिल्ह्यात नवे 2 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले.12 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी औषधोपचारातून कोरोनावर मात केल्याने त्यांना आज सुट्टी देण्यात आली.आजपर्यंत 41,086 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहे. 40,330 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे. क्रियाशील असलेल्या जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या 57 आहे.32 क्रियाशील असलेले बाधित रुग्ण घरीच अलगीकरणात आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील  कोवीडमुळे 699 रुग्ण दगावले असले तरी वास्तविक कोवीड 19 मुळे 573 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्ण आजारातून बरे होण्याचे प्रमाण 98.16 टक्के आहे. बाधित रुग्णांचा मृत्यू दर 1.81 टक्के आहे तर डब्लिंग रेट 431.2 दिवस आहे.