चंद्रपूर,दि.23ः- ताडोबा बफर झोन अंतर्गत येत असलेल्या पळसगाव रेंज मधील पळसगाव येथे वाघाने चारणदास बनसोड यांना जखमी केले. ही घटना आज दि 23 जून ची सकाळची आहे. या ठिकाणी रात्री पासूनच तीन वाघाने बस्तान मांडले होते. आज सकाळी लोक कामाला जात असताना हे तिन्ही वाघ दिसले त्यातील दोन वाघ पळून गेले तर एक वाघ तिथेच आहे. त्याच वाघाने जखमी केले तसेच वनरक्षक सुनील गुजेलवार यांना सुद्धा जखमी केले आहे.





