‘कौशल्यातून रोजगाराकडे-शेती व शेतीपूरक व्यवसाय’विषयावर शुक्रवारी ऑनलाईन मार्गदर्शन

0
38

वाशिम, दि. ३०  : राज्यातील युवक-युवतींसाठी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तालयामार्फत ‘कौशल्यातून रोजगाराकडे- शेती व शेतीपूरक व्यवसाय’ या विषयावर शुक्रवारी, २ जुलै २०२१ रोजी दुपारी ३  ते ५ वा. दरम्यान मोफत ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. तरी जिल्ह्यातील युवक-युवतींनी या मार्गदर्शन सत्राचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त सुनंदा बजाज यांनी केले आहे.

२ जुलै रोजी होणाऱ्या मार्गदर्शन सत्रात दु. ३ ते ३.३० वाजेपर्यंत नाशिक येथील सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे चेअरम तथा व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे, दु. ३.३० ते ४ वाजेपर्यंत पर्यटन संचालनालयाच्या उपसंचालक श्रीमती सुप्रिया करमरकर दातार, दुपारी ४ ते ४.३० वाजेपर्यंत परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अशोक धवन हे मार्गदर्शन करणार आहेत. इच्छुकांना  https://www.facebook.com/MaharashtraSDEED या फेबुक पेजद्वारे  किंवा https://www.youtube.com/channel/UC7o2gQB5q7VaITABN4FHw1A  या यु-ट्यूब लिंकच्या सहाय्याने वेबीनरमध्ये सहभागी होता येणार आहे.

राज्यातील युवक-युवतींसाठी वर्षभर प्रत्येक आठवड्यामध्ये दर शुक्रवारी दुपारी ३ ते ४ वाजेपर्यंत एकूण ५२ मार्गदर्शन व समुपदेशन सत्रांचे आयोजन केलेले आहे. यामध्ये तज्ज्ञ मार्गदर्शकांशी संवाद साधण्यात येणार असून त्याद्वारे उमेदवारांना रोजगार व स्वयंरोजगार विषयक मार्गदर्शन, करिअर मार्गदर्शन, दहावी-बारावी नंतरच्या संधी, इतर विविध क्षेत्रांसंबंधी माहितीविषयी मार्गदर्शन व समुपदेशन करण्यात येत आहे. तसेच प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी दुपारी ३ ते ४.३० वाजेपर्यंत विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षांकरिता एकूण १२ व प्रत्येक महिन्याच्या चौथ्या मंगळवारी ३ ते ४.३० वाजेपर्यंत उद्योजकता विषयक एकूण १२ असे वर्षभरामध्ये एकूण ७६ ऑनलाईन मोफत मार्गदर्शन व समुपदेशन सत्रांचे आयोजन करण्यात येत आहे.

जिल्ह्यातील युवक-युवतींनी या सत्रात सहभागी व्हावे. काही अडचणी असल्यास ०७२५२-२३१४९४, ९७६४७९४०३७, ९६६५५२५६५१, ८१०८८६८४०३ या क्रमांकावर संपर्क करावा अथवा जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, वाशिम या कार्यालयाशी संपर्क करावा, असे आवाहन श्रीमती बजाज यांनी केले आहे.