अखेर महाराष्ट्रात शाळेची घंटा वाजणार; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

0
302

मुंबई – संपूर्ण देशासह महाराष्ट्रातही गेल्या दीड वर्षांपासून कोरोनाचे संकट घोंगावत असल्याने शाळा बंद आहेत. मुलांचं शिक्षण हे दीड वर्षांपासून ऑनलाइन पद्धतीनेच सुरू आहे. त्यातच शाळा नेमक्या कधी सुरू होणार हा प्रश्न विद्यार्थ्यांसह पालकांनाही पडलेला आहे. यासंबंधी राज्य सरकारने आता महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, महाराष्ट्र सरकारने आता महाराष्ट्रातील शाळा सुरू होणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे शाळा कधी सुरू होणार याच्या प्रतीक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांना व पालकांना दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्रात सध्या कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

महाराष्ट्रातील ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आली आहे. तसेच जे जिल्हे कोरोनामुक्त झाले आहेत. अशा जिल्ह्यांमध्ये शाळेची घंटा वाजणार असल्याची घोषणा राज्य सरकारतर्फे करण्यात आली आहे. त्यामुळे आता राज्यातील शाळा लवकरच सुरू होणार असल्याचे समजत आहे.

यासंबंधी राज्य सरकारने केलेल्या घोषणेमुळे आता शाळेची घंटा वाजणार असल्याने विद्यार्थ्यांनाही परत एकदा दीड वर्षानंतर शाळेत जाण्याची उत्सुकता लागली आहे. तसेच आता सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर महाराष्ट्रात डेल्टा प्लस या नव्या विषाणूचे रुग्ण आढळून येत आहेत. त्यातच आता शाळा सुरू होणार असल्याने पालक विद्यार्थ्यांना शाळेत पाठवणार का? असा प्रश्न विचारला जात आहे.