खेमेंद्र कटरे/ गोंदिया. गेल्या काही दिवसांपासून नक्षली आपली दहशत पसरविण्याचा प्रयत्न बालाघाट जिल्ह्यात करत आहेत. त्याकरिता महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्यातील दलम आणि प्लाटूनची मदत घेण्यात येत आहे. मात्र पोलिसांनी देखील नक्षल्यांचे मनसुबे हाणून पाडले, आणि याउपरही अशा कारवाया हाणून पाडण्याकरिता यंत्रणेला आदेश दिले. त्यानुसार मध्यप्रदेश पोलिसांनी जाळे विणून दोन चारचाकी वाहनांना अडवून त्यांची झडती घेतली. त्या वाहनांतून बंदुकांसह विस्फोटक आणि इतर साहित्य जप्त केले. आठ जणांना अटक करण्यात आली असून त्यात राजस्थान, छत्तीसगड आणि गोंदिया जिल्ह्यातील दोघांचा समावेश आहे. 1 कोटीच्यावर रकमेचे साहित्य पोचविण्याची डील यांनी केली होती,त्या अगोदरच यांच्याकडून 30 लाख रुपयाचे नक्षलसाहित्यासह इतर साहित्य हस्तगत करण्यात आले आहे. विशेष म्हणजे यापुर्वी बेरार टाईम्सने कान्हाच्या परिसरात आणि बालाघाट जिल्ह्यात नक्षल्यांचा वावर वाढल्याचे वृत्त प्रकाशित केले होते.
बालाघाट पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार किरणापूर पोलीस ठाणेंतर्गत किरणापूर-किन्हीच्या जंगलपरिसरात नक्षल्यांना पुरवठा करण्यात येणारा साहित्य लपविण्यासाठी जागेचा शोध घेत काही व्यक्ती दोन चारचाकी वाहनांनी जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.त्यात नक्षल्यांना बंदुक आणि इतर विस्फोटक साहित्य नेत असल्याचेही कळले. त्यावरून मध्यप्रदेशातील बालाघाट पोलिसांना त्या वाहनांना घेराव करून पकडण्याची सूचना केली. पोलिसांनी किरणापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ते वाहन रोखून तपासणी करण्यात आली. दरम्यान त्या वाहनांतून बंदूक आणि इतर शस्त्र तसेच विस्फोटक जप्त करण्यात आले.
जप्त करण्यात आलेल्या साहित्यांत 32 इंच पिस्टर 3 नग, 32 इंच पिस्टलचे मॅग्जिन 3 नग, मॅग्जिन एके 47 अनफर्निश्ड 1 नग, 8 नग जिलेटिन रॉड, लाल रंगाचे कॉर्डेक्स 20 फूट, अॅण्ड्रॉइड मोबाईल, इनोव्हा चाकचाकी वाहन, स्कोडा चारचाकी वाहन, 9 नग एलईडी टॉर्च, 1 नग छत्री, 1 एअर पंप, 1 एमपी 3 प्लेअर, 3 पर्स, 1 सफारी सुटकेश, कापडांनी भरलेले तीन बॅग, 1 जोडी शर्ट आणि पॅंट आणि 6 टेंट आढळून आले. तत्काळ पोलिसांनी सर्व साहित्य जप्त करत आठही जणांना अटक केली.
अटक करण्यात आलेल्यांची नावे
या कारवाईत अटक केलेल्यांची नावे मुंबई येथील संजय नाजी भाई चित्रोडा, मुंबई येथील रोहित शिवा भाई बुटानी, गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यातील घनशाम शिवलाल आचले, विजय जीवन कोरेटी, राजस्थान राज्यातील कोटा येथील शकिल खान, वाजिद तैथरी, राजस्थानातीलच झालवाड येथील तौसिफ विनासी, जितेंद्र कुमार अग्रवाल यांचा समावेश आहे.
वर्षभरात 8 वेळ पुरविला शस्त्रसाठा
अटक करण्यात आलेल्या आरोपींची बालाघाट पोलिसांची कसून चौकशी केली. दरम्यान त्यांनी गेल्या वर्षभरात सात ते आठवेळा नक्षल्यांना शस्त्र, विस्फोटक, नाईट व्हिजन, बायनाकूलर, हायरेंज टॉर्च, टेक्निकल शूज आणि इतर साहित्य पोहोचविल्याची माहिती दिली. त्याच्या मोबदल्यात नक्षल्यांनी त्यांना 25 लाख रुपये दिल्याचे सांगितले. अटक करण्यात आलेले काही आरोपींचे नक्षल्यांशी गेल्या 4 ते 5 वर्षांपासून संबंध आहेत. ते बालाघाट जिल्ह्यात सक्रिय टांडा दलम, मलाजखंड दलम, दर्रेकसा दलम आणि विस्तार प्लाटून 2, विस्तार प्लाटून 3 आणि खटिया मोचा एरिया कमिटीच्या नक्षल्यांना शस्त्र आणि विस्फोटक साहित्य पोहोचवत होते.
नक्षल शहिद सप्ताहात होता घातपाताचा कट
पोलिसांनी जप्त केलेले साहित्य नक्षल शहिद सप्ताहात मोठे घातपात घडवून आणण्याकरिता उपयोगात आणले जाणार होते. पोलिसांच्या विरोधात हे सर्व साहित्य वापरण्यात येणार होते. पोलिसांनी वेळीच प्रसंगावधान राखून हे साहित्य जप्त केले. या कारवाईमुळे पोलिसांचे मनसुबे उधळून लावण्यात पोलिसांना यश आले.
बालाघाटचे पोलीस अधिक्षक अभिषेक तिवारी यांनी सदर कारवाईबद्दल बोलतांना सांगितले की गुप्त माहितीच्या आधारे आम्हाला माहिती मिळाल्यानंतर सापळा रचून ही कारवाई करण्यात आली.गोंदिया पोलीस व बालाघाट पोलीस गेल्या काही दिवसापासून सतत या भागातील कारवायावर नजर ठेवून होते.यात मोठे यश पोलिसांना आले असून आर्थिक रसद पुरविणारी टोळी हाती लागल्याने अजून माहिती समोर येणार आहे.
मध्यप्रदेश नक्षल विरोधी पथकाचे पोलीस महानिरिक्षक साजित फरीद शापू यांनी भोपाळ येथे दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणातील सुत्रधार संजय असून तो मुंबईत आधी ड्रग्स पुरवठ्याचे काम करायचा.त्याची ओळख व भेट गडचिरोली जिल्ह्यातील रामदास नामक टेलर सोबत झाली.येथूनच हा घनश्यामशी संपर्क आला.घनश्याम हा नक्षल्यांचे वर्दी शिवण्याचे काम करायचा.घनश्यामच्या माध्यमातूनच संजयने नक्षल्यांना हत्यार पोचविण्याची लिंक तयार केली होती.आरोपी हे राजस्थानातील काही ठिकाणाहून हत्यार खरेदी करुन ते महाराष्ट्र व सेंधवा(जिल्हा बडवानी मध्यप्रदेश)च्या सिमेतून मध्यप्रदेशात आणायचे असे सांगितले.
या ठिकाणी होते सक्रिय हे गिरोह : महाराष्ट्र- राज्य गोंदिया ,गडचिरौली,छत्तीसगढ़- कवर्धा,राजनांदगांव आणि मध्य प्रदेश- सक्रिय सर्व नक्षल दलमला बालाघाट वरुन पुरवठा करीत होते.
खास बात : गेल्या एक दशकापासून हे नक्षलनेटवर्कसी जुळून काम करीत होते.त्यातच 500 काडतूसची डील होत असल्याची पोलिसांनी मिळाली होती माहिती
. गेल्या काही दिवसांपासून नक्षली आपली दहशत पसरविण्याचा प्रयत्न बालाघाट जिल्ह्यात करत आहेत. त्याकरिता महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्यातील दलम आणि प्लाटूनची मदत घेण्यात येत आहे. मात्र पोलिसांनी देखील नक्षल्यांचे मनसुबे हाणून पाडले, आणि याउपरही अशा कारवाया हाणून पाडण्याकरिता यंत्रणेला आदेश दिले. त्यानुसार मध्यप्रदेश पोलिसांनी जाळए विणून दोन चारचाकी वाहनांना अडवून त्यांची झडती घेतली. त्या वाहनांतून बंदुकांसह विस्फोटक आणि इतर साहित्य जप्त केले. आठ जणांना अटक करण्यात आली असून त्यात राजस्थान, छत्तीसगड आणि गोंदिया जिल्ह्यातील दोघांचा समावेश आहे.
बालाघाट पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार किरणापूर पोलीस ठाणेंतर्गत काही व्यक्ती दोन चारचाकी वाहनांनी जात असल्याची मिळाली. ते नक्षल्यांना बंदुक आणि इतर विस्फोटक साहित्य नेत असल्याचेही कळले. त्यावरून मध्यप्रदेश पोलिसांनी बालाघाट पोलिसांना त्या वाहनांना घेराव करून पकडण्याची सूचना केली. पोलिसांनी किरणापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ते वाहन रोखून तपासणी करण्यात आली. दरम्यान त्या वाहनांतून बंदूक आणि इतर शस्त्र तसेच विस्फोटक जप्त करण्यात आले. जप्त करण्यात आलेल्या साहित्यांत 32 इंच पिस्टर 3 नग, 32 इंच पिस्टलचे मॅग्जिन 3 नग, मॅग्जिन एके 47 अनफर्निश्ड 1 नग, 8 नग जिलेटिन रॉड, लाल रंगाचे कॉर्डेक्स 20 फूट, अॅण्ड्रॉइड मोबाईल, इनोव्हा चाकचाकी वाहन, स्कोडा चारचाकी वाहन, 9 नग एलईडी टॉर्च, 1 नग छत्री, 1 एअर पंप, 1 एमपी 3 प्लेअर, 3 पर्स, 1 सफारी सुटकेश, कापडांनी भरलेले तीन बॅग, 1 जोडी शर्ट आणि पॅंट आणि 6 टेंट आढळून आले. तत्काळ पोलिसांनी सर्व साहित्य जप्त करत आठही जणांना अटक केली.