
गडचिरोली ,दि.10ः-येथील फुले वाॅर्डातील सामाजिक कार्यकर्ते दुर्योधन रायपुरे यांच्या हत्या प्रकरणात गडचिरोली पोलीसांनी गडचिरोली नगर परिषदेचे नियोजन व विकास सभापती प्रशांत खोब्रागडे यांना चौकशी करीता ताब्यात घेत अटक केली आहे. त्यांच्यावपर 302 व 201 कलम लावण्यात आले आहे. खोब्रागडे हे अपक्ष निवडून आले होते. त्यांनी नंतर भाजपला समर्थन दिल्यामुळे त्यांना नियोजन व विकास समितीचे सभापती पद मिळाले.
सामाजिक कार्यकर्ते दुर्योधन रायपूरे यांची 24 जूनच्या रात्री त्यांच्या निवासस्थानी हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी 3 जुलै रोजी अमन कालसर्पे (18) या पहिल्या आरोपीला अटक गडचिरोली पोलिसांनी केली होती.त्यानंतर चौकशीत मिळालेल्या माहितीच्या आधारे अन्य तीन आरोपींना 6 जुलै रोजी अटक केली. या तिन्ही आरोपींना 7 जूलै रोजी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने 13 जुलैपर्यंत सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपींमध्ये प्रसन्ना रेड्डी (24), अविनाश मत्ते (26), धनंजय उके (31), सर्व राहणार गोंदिया यांचा समावेश आहे. या चारही आरोपींवर भादंविचे कलम 302, 201 अन्वये गडचिरोली पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. या प्रकरणाचा तपास करताना संंशयाची सुई नगरसेवक प्रशांत खोब्रागडे यांचेकडे वळली. प्राप्त माहितीनुसार हे चारही आरोपी नगरसेवक प्रशांत खोब्रागडे सोबत 4 दिवस होते. ते या आरोपींना गडचिरोली नगर परिषदेतही घेऊन गेले होते. या मााहितीच्या आधारेच तपास अधिकाऱ्याने खोब्रागडे यांना चौकशी करीता ताब्यात घेतल्याची चर्चा आहे. पोलीसांनी नगरपरिषदेतील सीसी टीव्ही फुटेज मागितले आहे.
सामाजिक कार्यकर्ते दुर्योधन रायपुरे यांच्या हत्येप्रकरणी गडचिरोली पोलीसांनी गतीने तपास करून चार आरोपींना अटक करून पाचव्याला चौकशी करीता ताब्यात घेतले आहे.मात्र ठोस पुरावा हाती लागेपर्यंत कोणाला आरोपी करता येणार नाही, असे पोलीसांचे मत आहे.





