35.7 C
Gondiā
Tuesday, June 9, 2026
Home राष्ट्रीय देश अदानी समुहाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत गौतम अदाणीनी साधला भागधारकांशी सवांद

अदानी समुहाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत गौतम अदाणीनी साधला भागधारकांशी सवांद

0
40

blank

मला तुम्हाला प्रत्यक्ष भेटायला आवडले असते परंतु सध्याची सुरक्षिततेच्या उपायांची गरज लक्षात घेता, या आभासी भेटी हेच सध्याचे वास्तव झाले आहे. पण मी आशावादी आहे आणि मला विश्वास आहे कि २०२२ च्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आपली प्रत्यक्ष भेट होईल आणि तुमच्यापैकी काहीजणांशी प्रत्यक्ष हस्तांदोलन करता येईल.

आजच्या या प्रसंगी मला माझ्या चिंतनातील काही अंश तुमच्या समोर मांडायला आवडेल-कोविड -१९ या महामारीमुळे गेले वर्ष आपल्या सर्वानाच अत्यंत कठीण गेले, या महामारीने दिलेले घाव पूर्णपणे भरून येण्यासाठी काही दशकांचा कालावधी जावा लागणार आहे. या महामारीबाबतची आकडेवारी हि भयचकित करणारी आहे. या महामारीच्या जगभरात १९ कोटी केसेस नोंदल्या गेल्या, नोंदवल्या इतिहासात  कोविड-१९ महामारी हि जगासमोरचे सर्वात मोठे आव्हान बनले आहे. हि महामारी अत्यंत प्राणघातक असून तिने जो जगभर धुमाकूळ घातला आहे त्यात ४० लाखाहून अधिक लोकांचा बळी गेला आहे. कोणताही खंड, कोणताही देश आणि  कोणताही समाज या महामारीच्या तडाख्यातून सुटलेला नाही.

प्रत्येक गेलेला प्राण हि  एक शोकांतिका आहे.  आपण देश म्हणून अजून चांगली कामगिरी करू शकलो असतो, विशेषतः दुसऱ्या लाटे दरम्यान.  जगातील विविध राष्ट्रे आपल्या सर्व साधनसामुग्रीसह या महामारीशी लढण्यात गुंतली असताना, आपल्या देशाला काही टीकाकारांकडून लक्ष्य केल्याचे दिसुन आले, विशेतः लसीकरणाच्या आघाडीवर.

आपल्या देशाची प्रचंड लोकसंख्या आणि महानगरातील लोकसंख्येची घनता हे लक्षात घेता आपल्या समोरील आव्हाने हि  अधिक कडवी आहेत. हे आपण लक्षात घेतले पाहिजे कि  सम्पूर्ण  युरोप, उत्तर अमेरिका आणि ओशियना यांच्या एकत्र लोकसंख्येपेक्षा आपली लोकसंख्य ही अधिक आहे म्हणजे आपले लसीकरणाचे लक्ष्य हे ८७ देशांपेक्षा अधिक आहे. सम्पूर्ण जगात ३२० कोटी लसीच्या मात्रांची गरज  आहे, फक्त एकट्या भारताची गरज हि ३५ कोटी मात्र इतकी  आहे.   यापैकी  काही टीका जरी योग्य असली तरी आपण आपल्याला हतोतसाहित करणाऱ्या आणि आपल्या फ्रंटलाईन वर्कर्स आणि आरोग्य सेवकांनी जो असीम त्याग केला आहे त्यांचे मनोबल तोडणाऱ्या टीकेला आपल्याला बळी पडुन चालणार नाही.

हे सर्व फ्रंटलाईन वर्कर्स हे आपले प्रेरणास्थान आहेत.

देशाची मदत करताना ती आकड्यात मोजणं हे सर्वस्वी चुकीचे आहे जे आम्ही कॉर्पोरेट्स करतो. देशाच्या मदतीला धावून जाणे म्हणजे त्या प्रत्येक नागरिकांच्या मदतीला धावून जाणे, ज्याच्या पर्यंत आपण पोहचू शकतो आणि आपल्या प्रत्येक कृतीतून देश पहिला हे दाखवून देणे आणि या आदर्शाचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे आपले फ्रंटलाईन वर्कर्स, ज्यांनी आपल्या  वागण्या बोलण्यातून आणि कृतीतून सेवा परमो धर्म याचा करा अर्थ आपल्याला दाखवून दिला. आपले प्रथम कर्तव्य हे मानवजातीची सेवा करणे हे आहे.

अदाणी  समूहाने जगभरातून महत्वपूर्ण असा द्रवरूप प्राणवायू, क्रायोजेनिक टँक्स आणि प्राणवायू सिलेंडर्स आदी देशात आणण्यासाठी आपले योगदान दिले परंतु आमच्या या योगदानापेक्षा भारतीय वायुसेनेच्या पुरुष आणि महिला अधिकाऱयांच्ये योगदान हे अधिक महत्वपूर्ण आहे ज्यांनी हि सामुग्री देशात आणण्यासाठी जगभर असंख्य उड्डाणे भरली.

आम्ही पीएम केअर फंडमध्ये आमचे योगदान दिले परंतु पैशापेक्षा अधिक महत्वपूर्ण आहे तो वैयक्तिक त्याग, जो पैशात मोजता येऊ शकत नाही. सामान्य भारतीयांनी रस्त्यावरच्या असंख्य लोकांना मदत केली कि ज्यांना ते आयुष्यात परत कधीही भेटणार नव्हते.

हे खरं आहे कि अदाणी  समूहाने देशाला लॉजिस्टिक सपोर्ट दिला आणि हवाई, जल, रस्ते आणि रेल्वे मार्गाने अत्यन्त महत्वाच्या हजारो टन साधनसामुग्रीची ने-आण केली ज्याची तातडीची निकड होती परंतु आमची हि कामगिरी त्या हजारो डॉक्टर्स आणि नर्सेस च्या कामगिरी समोर काहीच  नाही ज्यांनी जिवावर उदार होऊन  देशवासियांची सेवा केली.

वैयक्तिक त्यागाची आणि मानवतेचे दर्शन घडवणारी असंख्य उदाहरणे आपण या काळात पहिली, ज्याच्या पुढे नतमस्तक व्हावेसे वाटते आणि या सर्व काळात अदाणी फौंडेशन ने आपल्या साधनांसह आणि तज्ञ्यांच्या मदतीने प्राणवायूचे वितरण आणि रुग्णांची काळजी वाहण्याचे काम केले

उदाहरणार्थ थोड्या दिवसांच्या अवधीमध्ये, आमच्या अभियांत्रिकी  आणि वैद्यकीय चमूने अहमदाबादमधील अदाणी विद्या मंदिरचे रुपांतर शेकडो खाटांच्या सुसज्ज अशा रुग्णालयात केले, जिथे प्राणवायू आणि शिजवलेले अन्न अशा अनेक सुविधा होत्या. हे  खरोखरच विद्यादानातून जीवनदान होते. आमच्या शाळेचे वर्ग हे जीवन दान देणारे वर्ग झाले. तसेच भुज आणि मुंद्रा येथील आमची रुग्णालये हि १००% कोविड केअर रुग्णालये झाली.

हे सर्व शक्य झाले ते हजारो अदाणीयनसच्या प्रयत्नामुळे,  ज्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता हे पवित्र कार्य पूर्ण केले. या बाबत एक उध्दरणच द्यायचे झाले तर लॉजिस्टिक डिव्हिजनच्या कर्मचाऱ्यांनी शीत कपाटांत साठवलेल्या लसी देशभर पुरवण्यासाठी जे अंतर कापले ते दोन वेळा पृथ्वी प्रदक्षिणा केल्यावर जेवढे अंतर भरले असते तेवढे होते.  मला या प्रसंगी या सर्वांचे मनापासून आभार मानावेसे वाटत आहेत आणि त्यांनी  जी  कामगिरी केली किंवा अजूनही करत आहेत त्याचा मला अभिमान वाटत आहे.

आपण आता वळू या आपल्या कंपनीच्या आर्थिक कामगिरीकडे. गेले वर्ष हे अत्यंत अडचणीचे होते परंतु ज्यांनी नाविन्यपूर्ण मार्ग चोखाळले त्यांच्यासाठी हा कठीण काळ सुद्धा आपल्या व्यवसायात वृद्धी करण्याच्या संधी घेऊन आला. ज्यांनी आपल्या शिडात हवा भरून घेतली आणि वाऱ्यावर स्वार होण्याचे धाडस दाखवले त्यांनी या काळातसुद्धा दमदार कामगिरी केली आणि मला अभिमान  आहे  कि या महामारीच्या गडद धुक्यात सुद्धा आपल्या सहा सूचिबद्ध कंपन्यानी बाजाराचे नेतृत्व करत लवचिक व्यवस्थापनाच्या जोरावर नफा कसा मिळवला जाऊ शकतो याचा मार्ग बाजाराला दाखवला.

आपल्या सूचिबद्ध कंपन्यांनी आपल्या जोरदार कामगिरीच्या जोरावर आर्थिक वर्षांच्या  पहिल्याच  आठवड्यात कंपन्यांचे बाजारमूल्य हे $ १०० बिलियन च्या पुढे नेऊन दाखवले आणि आपण हे लक्षात घेतले पाहिजे कि हे बाजार मूल्य हे अशा कंपनीचे आहे कि जी पहिल्या पिढीतील कंपनी आहे. जरी आपल्याला या कामगिरीचा आभिमान असला तरी आपण हे लक्षात ठेवले पाहिजे कि बाजार मूल्य हे आपण  जो  आजवर मार्ग चोखाळला त्याचे फलित आहे पण खरे महत्व हे आपण यापुढे ज्या मार्गावर चालणार आहोत त्याचे आहे.  मी या साऱ्या कामगिरीचे श्रेय आपण ज्या मुल्याना मानतो त्याला देतो. या मूल्यांच्या जोरावरच  आपण आपल्या देशबांधणीच्या मार्गावर पुढे जात आहोत आणि नुकत्याच सरलेल्या वर्षाने या मूल्यांवरचा माझा विश्वास अधिकच दृढ झाला आहे. या  मूल्यांनी आपल्याला केवळ अनेक अडचणींवर मात करण्याचे बळ दिले असे नाही तर यापेक्षाही अधिक जटील अडचणींवर मात करण्याचे सामर्थ्य दिले

आम्ही ज्याची काल बांधणी केली त्याने आमचा वर्तमान काळ सुरक्षित केला आणि आम्ही आज ज्याची बांधणी करत आहोत त्याने आमचा भविष्यकाळ अधिक उज्वल  होणार आहे. आमची तीन प्रार्थमिक मूल्ये हिंमत, विश्वास आणि बांधिलकी यांनी हे या सर्व यशाच्या मुळाशी आहेत. आमाची वाढ हि नुकतीच सुरु झाली आहे आणि हे आमच्या सहा सूचिबद्ध कंपन्यांच्या कामगिरीतून दिसून येते.  या सर्व कंपन्यांची कामगिरी हि बाजाराच्या निर्देशांकापेक्षा वरचढ आहे.

२०२१ या आर्थिक वर्षासाठी सूचिबद्ध कंपन्यांचे व्याज, कर, घसारा आणि परिशोधन (अमोर्टिझशन) एकत्रित उत्पन्न हे ३२,००० कोटी इतके होते, मागील आर्थिक  वर्षापेक्षा २२% वाढ या  कंपन्यांनी उत्पन्नात  नोंदवली. सर्व अदाणी कंपन्यांच्या समभागनी १००% हुन अधिक परतावा दिला. जवळपास ९,५०० कोटी रुपयाचा परतावा समभागधारकांना देण्यात आला. कंपन्यांचा करोत्तर नफा १६६% नी गेल्या आर्थिक वर्षापेक्षा वाढला.

इथे मला तुमचे लक्ष हे आम्ही आमच्या गुंतवणुकीकडे कसे बघतो या कडे बघतो याकडे वेधायचे आहे, आमचा गुंतवणुकीकडे बघण्याचा दृष्टिकोन हा पिढ्यांच्या पलीकडे जातो. आम्ही आमच्या गुंतवणुकीतून आमच्या भागीदार, आमचे अल्पसंक्यांक गुंतवणूकदार आणि आमच्या स्वतःसाठी साठी दीर्घ कालीन शाश्वत मूल्य तयार करण्यावर विश्वास ठेवतो. मात्र काही मध्यमसमूहांच्या बाजार नियमकाच्या काही प्रशासकीय कार्यवाहीवीबाबत च्या  बेजबाबदार आणि बेदरकार वृत्तांकनाने अदाणी समूहांच्या समभागात त्रीव्र चढ-उतार दिसून आले.  या घडामोडींचा काही छोट्या गुंतवणूकदारांवर विपरीत परिणाम झाला.

अशा घटना आमचे लक्ष विचलित करू शकणार नाहीत आणि एक कंपनी म्हणून आमच्यात हा  कायमच आत्मविश्वास राहिला आहे कि आम्ही अशा आव्हानांचा सामना करू शकतो कि ज्याची इतर कल्पना पण करू शकत नाहीत. आमच्या समोर पुढे ठाकलेले  प्रत्येक आव्हान आम्हाला अधिक मजबूत आणि अशा आव्हानांचा सामना करण्यासाठी सक्षम करते.

मी आता तुमच्यासमोर गेल्या वर्षभरात अदाणी  समूहाने जे मैलाचे दगड पार केले त्याची माहिती ठेवू इछीतो.

अदाणी  पोर्ट्स आणि एसइझेड हि कंपनी स्वतःला फक्त बंदर व्यवसायात कार्यरत असलेल्या कंपनीमधून एकीकृत अशा बंदर आणि लॉजिस्टिक कंपनीत परावर्तित करत आहे.  २०२१ हे आर्थिक वर्ष कंपनीच्या दृष्टीने सर्वार्थाने महत्वपूर्ण ठरले आणि कंपनी ने या काळात महत्वपूर्ण टप्पा गाठला. कंपनीने या काळात भारतातील बंदरावरून हाताळल्या गेलेल्या मालापैकी २५% हिस्सा मिळवला तर कंटेनर विभागात कंपनीचा हिस्सा ४१% इतका राहिला. कंपनीने आपल्या पोर्टफोलिओ मध्ये या काळात एलएनजी आणि एलपीजी हाताळणी व्यवसायाचा समावेश करून विविधीकरणाला गती दिली. तशेच धर्मा  बंदरातूनही  एलएनजी व्यवसाय हाताळणीची सुरवात केली. जगातील दुसरी कोणतीही कंपनी इतक्या मोठ्या प्रमाणात बंदर व्यवसायात कार्यरत नाही.

अदाणी  ग्रीन एनर्जी हि कंपनी अपारंपरिक ऊर्जा क्षेत्राचे भवितव्यच बदलत आहे. २०२० मध्ये हि  कंपनी जगातील सौर ऊर्जा निर्माण करणारी सर्वात मोठी कंपनी बनली आणि हे या कंपनीने फक्त पाच वर्षात साध्य केले. गेल्या महिन्यात एसबी एनर्जीच्या सम्पादनानंतर या कंपनीची ५ गिगावॅट अपारंपरिक ऊर्जेचा पोर्टफोलिओ ताब्यात आला.  हि कंपनी $ ३.५ अब्ज डॉलरला ताब्यात घेण्यात आली.  यामुळे २५ गिगावॅट ची क्षमता निर्माण करण्याचे लक्ष्य मुदतीच्या आधी चार वर्ष पूर्ण करण्यात आले.  जागतिक स्तरावर कुठल्याही दुसऱ्या कंपनीने इतक्या वेगाने अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रात आपल्या पावलांचा ठसा उमटवलेला नाही.

अदाणी  एनटरप्राइजेस या कंपनी मार्फत समूहाने विमानतळ विकास या क्षेत्रात पाउल ठेवले आहे आणि आता भारतातील प्रत्येक चार प्रवाशांपैकी एक प्रवासी हा   अदाणी  विमानतळावरून उड्डाण करतो. जगातल्या कुठल्याही देशात एखाद्या विमानतळ कंपनीने एकूण प्रवासी वाहतुकीपैकी २५% हिस्सा मिळवलेला नाही.  कंपनीने नुकतेच अहमदाबाद, लखनौ आणि मंगलोर विमानतळांवर ताबा मिळवला आहे आणि गुवाहाटी, जयपूर आणि तिरुअनंतपुरम या विमानतळांसाठी सवलत करारांवर सह्या केलेल्या आहेत.  या शिवाय कंपनीकडून मुंबई आणि नवी मुंबई विमानतळाचा ताबा मिळवण्याची प्रक्रिया सुरु आहे. कंपनीकडून सम्पूर्ण भारतभर विमानतळाचे जाळे उभारण्याशिवाय, प्रवाशांकडून मिळणाऱ्या उत्प्नशिवाय इतर स्रोतातून उत्त्पन्न मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत आणि भौतिक आणि डिजिटल पायाभूत सुविधांमधून निर्माण होणाऱ्या शक्यता  हि तपासून पहिल्या जात आहेत.

अदाणी  एंटरप्राइसेचे  बिझनेस जगतातील नवं नवं कल्पनांचा पाळणा म्हणून कायमच नोंद घेतली जाईल आणि बिझनेस जगतात नवनवीन कल्पना आणि प्रारूपे यांना जन्म घालण्याचे कंपनीचे रेकॉर्ड अभाधित आहे.

जरी आपल्याला समाधान वाटावे अशी परिस्थिती असली तरी, खऱ्या द्रुत गती वाढीचा काळ आत्ता कुठे सुरु होत आहे. याचे मुख्य  कारण म्हणजे जरी अदाणी  समूह विविध क्षेत्रात कार्यरत असला तरी सर्व कंपन्या ह्या सामरिकदृष्ट्या एकमेकांशी निकटचे संबंध राखून आहेत आणि यातूनच आपली विविध क्षेत्रात भविष्यात प्रगती होत राहणार आहे.

आपण आता बंदर, विमानतळ, लॉजिस्टिक, नैसर्गिक संसाधने, औष्णिक आणि अपारंपरिक वीज उत्पादन,  पारेषण, वितरण, डेटा सेन्टर, संरक्षण, बांधकाम, शहरी वायू वितरण आणि इतर अनेक क्षेत्रात आज अदाणी  समूह कार्यरत आहे.  यातील प्रत्येक क्षेत्र हे जलद गतीने वाढत आहे, याशिवाय या प्रत्येक क्षेत्राचा एकमेकांशी निकटचा सम्बन्ध आहे. तसेच भविष्यात आपण ज्या क्षेत्रात प्रवेश  करणार आहोत त्यांचा  हि या क्षेत्रांशी निकटचा  संबंध असणार आहे.

स्वतःचे वेगळेपण जपणारे अदाणी प्रारूप, निकटतेची शक्ती वापरून बी२बी आणि बी२सी क्षेत्रातील क्षमतांचा समन्वय या प्रारूपातून केला जात आहे आणि हा मार्ग आपल्याला अगणित शक्यतांकडे घेऊन जात आहे आणि जेंव्हा भारता सारखी आर्थिक शक्ती या प्रयत्नांमागे असते तेंव्हा या शक्यता सत्यात उतरण्याची अधिक संधी असते.

मला तरी प्रगतीचे दुसरे कुठले हि प्रारूप माहिती नाही जे   बी२बी आणि बी२सी या दोन्ही क्षेत्रात अमर्यादित पुढची अनेक दशके संधी उपलब्ध करून देऊ शकेल.

गेल्या वर्षभरात अदाणी  फौंडेशन च्या कार्याचे महत्व अनेक पटीने वाढले. फौंडेशनने कोविड सम्बंधित कार्यात पुढाकार घेतानाच आपले नेहमीचे कुठलेच उपक्रम थांबवले नाहीत. मला या क्षणी माझी पत्नी प्रीती हिचे आभार मानावेसे वाटतात कारण ती शांतपणे आणि निस्पृहपणे आपले हृदय आणि आत्मा अर्पून सतत वाढत जाणाऱ्या अदाणी  फौंडेशन च्या कामात तिने स्वतःला झोकून दिले आहे. ती पडद्यामागे राहणे पसन्त करते परंतु मला तिचे योगदान काय आहे याची पूर्ण कल्पना आहे, विशेतः गेल्या वर्षात जे आपणा सर्वांसाठी अत्यन्त अडचणीचे होते, तेव्हा तीचे योगदान हे अत्यंत महत्वपूर्ण होते. चांगुलपणासह भरभराट देण्यासाठी जेंव्हा आम्ही प्रयत्नशील असतो तेंव्हा ती माझी सद्सदविवेक बुद्धी म्हणून काम करत असते.

अदाणी  फौंडेशनच्या अनेक कामांपैकी दोन कामे हि माझी विशेष लाडकी  आहेत.  सुपोषण प्रकल्पाने जो परिणाम साधला आहे त्याचा मला अभिमान आहे. या उपक्रमाने असंख्य महिलांना लहान बालकांचे आरोग्य सांभांळयासाठी सक्षम केले.  सुपोषण उपक्रमाने ३३,००० बालकांना कुपोषणाच्या गर्तेतून बाहेर काढले, देश बांधणीसाठी याशिवाय दुसरा अधिक समर्पक उपक्रम कोणता असू शकतो!

दुसरा महत्वपूर्ण प्रकल्प ज्याचा मला अभिमान वाटतो तो म्हणजे, क्रीडा क्षेत्रातील टॅलेंट जोपासण्याचा प्रकल्प.  ‘गर्व है’, या उपक्रमांतर्गत ज्या १० क्रीडापटूंची जबाबदारी अदाणी  फौंडेशनने घेतली आहे त्यापैकी  ७ जण हे टोकियो ऑलिम्पिक स्पर्धांसाठी पात्र ठरले आहेत. यात अमित पांघल, राणी रामपाल, दीपक पुनिया, के टी इरफान, रवी कुमार, अंकिता रैना आणि शिवपाल सिंग यांचा समावेश होतो. हे खेळाडू मुष्टियुद्ध, हॉकी, कुस्ती, ऍथलेटिकस, आणि टेनिस या खेळात देशाचे प्रतिनिधित्व करतील. या शिवाय फौंडेशन कडून अनेक जुनिअर खेळाडूंची हि जबाबदारी घेण्यात आली  आहे, जे येत्या काळात आंतरराष्ट्रीय स्पर्धात देशाचे प्रतिनिधित्व करतील.  यापैकी बहुतांश खेळाडू हे अत्यन्त साधारण परिस्थितून आले आहेत. त्यांची प्रत्येकाची स्वतःची संघर्षाची कहाणी  आहे आणि ती अत्यंत प्रेरणादायी आहे. पदक  मिळवणे हे माझ्यासाठी फारसे महत्वाचे नाही, महत्वाचे हे  आहे  कि त्यांच्या या प्रेरणादायी कहाण्या मला स्वतःला प्रेरणा देतात.

समारोप करण्यापूर्वी मला देशाच्या दीर्घ कालीन भविष्याविषयी माझे काही विचार तुमच्यापुढे मांडायला आवडेल. गेल्या काही दिवसात अशी चर्चा ऐकाला मिळत आहे कि भारत येत्या चार वर्षात $ ५ ट्रिलयनची अर्थव्यवस्था बनण्याचे स्वप्न साकार करू शकतो का? माझ्या दृष्टीने हा प्रश्न पूर्णतः गैरलागू आहे. जगाने प्रत्येक महामारीतून धडे घेतले आहेत आणि माझा विश्वास आहे कि या महामारीने जगाला आणि भारताला अधिक शहाणे केले आहे.  भारत $ ५ ट्रिलयन ची अर्थव्यवस्था तर बनेलच परंतु येत्या दोन दशकात $ १५ ट्रिलियन ची अर्थव्यवस्था बनेल.  फक्त वस्तू  आणि सेवांचा खपाच्या दृष्टीनेच नाही तर बाजार मूल्याच्या दृष्टीने सुद्धा भारत एक जगातील मोठी अर्थ व्यवस्था म्हणून येत्या काळात पुढे येईल. जसे पूर्वी आपल्या समोर अडचणीचे डोंगर उभे राहिले तसेच भविष्यात ही उभे राहतील. पण जगातील सर्वात मोठा मध्यम वर्ग हा भारताची शक्ती आहे आणि या सतत वृद्धिंगत होणाऱ्या मध्यम वर्गामुळे काम करणाऱ्यांची  तसेच उपभोग घेणाऱ्यांची संख्याही वाढतच जाणार आहे. भारताला लोकसंख्याशास्त्रीय लाभांश मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि  मला  विश्वास आहे कि येणाऱ्या प्रत्येक संकटावर आपण मात करू.

सतत वृद्धिंगत होणाऱ्या मध्यम वर्गामुळे भारत  आज  एका स्वप्नवत स्थितीत उभा आहे आणि आज देशाची धावपट्टी हि जगातील सर्वात लांब धावपट्टी आहे. जय हिंद !

 

 

blank