42.4 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home गुन्हेवार्ता ट्रॅक्टर चालकाचा नियंत्रन सुटल्याने चार जखमी

ट्रॅक्टर चालकाचा नियंत्रन सुटल्याने चार जखमी

0
95

blank

चिचगड*:-दि.३१ ::येथील पोलीस स्टेशन चिचगड समोरच ट्रॅक्टर वाहन चालकाचा नियंत्रन सुटल्याने रस्त्यावर चालत असलेल्या पोलिस जवानासह तिन लोकानां ट्रॅक्टरने धडक दिली.त्यात चार व्यक्ती गंभीर जखमी झाले असुन, त्यांना प्रथोमपचाराकरिता ग्रामीण रुग्णालय चिचगड येथे नेण्यात आले. अपघातात जखमी झालेल्या रुग्नांची परिस्थिती गंभीर असल्याने त्यांना जिल्हा रुग्णालय गोंदिया इथे हलविण्यात आले आहे.

या घटनेत जखमी झालेल्या व्यक्तीत अविनाश यादवराव निकोडे राहणार सिंगनडोह वय (१२) वर्ष , यादवराव निकोडे राहनार सिंगनडोह वय (५०) वर्ष, लखनलाल रघुजी बडोले राहणार चिचगड वय (७२) वर्ष, प्रकाश नामदेव शिंदे SRFF पोलीस जवान वय (३०) वर्ष, असे आहे.घटनास्थळी मिळालेल्या माहीतीनुसार सदर ट्रॅक्टर हा नवीन असुन ट्रॅक्टरचा नंबरही येन्यास आहे. ट्रॅक्टर चालक अस्विन रुशेस्वर शहारे राहनार अंभोरा वय (२८) वर्ष, असे असुन या ट्रॅक्टर वाहन चालकाकडे वाहन चालविन्याचा परवाना सुद्धा नसल्याचे सांगन्यात येत आहे.सदर ट्रॅक्टर वाहन चालका विरोधात कलम २७९,३३७ ,३३८ भादवि ,सह.कलम १८४ मोटार वाहन कायद्या अंतर्गत गुन्हा नोदं करन्यात आले असुन तपास सुरू आहे.

blank