31.4 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home विदर्भ  दिवाळी तोंडवर असूनही आधारभूत धान्य खरेदी केंद्र उघडले नाही शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात...

 दिवाळी तोंडवर असूनही आधारभूत धान्य खरेदी केंद्र उघडले नाही शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात  

0
32
 गोंदिया दि.८::- दीप उत्सोवला चार दिवस शिलक आहेत मात्र अद्यापही आधार भूत किमतीने धान्य खरेदी करणारे केंद्र उघडले नसल्याने या वर्षी शेत्कार्यानची दिवाळी आधारतच राहणार आहे .तर कृषी उत्तपन बाजार समितीत कवळी मोल भावात धान्य विक्री करताना खाजगी व्यापार्यान कडून शेतकर्यांची फसवणूक होत आहे.शासनाने क श्रेणीच्या धानाला १४१० आणि अ श्रेणीच्या धानाला १४५० किमत दिली असली तरीही शेतकर्यांना कृषी उत्पन बाजार समितीत अडत कापून ११०० रुपये प्रती क्विंटल धान्य विकावा लागत आहे .गोंदिया जिल्हा राज्यातच नव्हे तर देशातही ( राईस सिटी च्या नावाने ) धान्य उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातो. दर वर्षी १५ आक्टोंबरला जिल्यात आधारभूत किमतीने धान्य खरेदी करणारे केंद्र जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंळडाच्या वतीने सब एजेंट नेमून धान्य खरेदी केली जाते या वर्षी ४६ केंद्रांना परवानगी देण्यात आली आहे मात्र शासनाच्या चुकीच्या धोरणाने सब एजेंटने धान्य खरेदी करणारे केंद्र उघडायला नकार दिला असल्याने अद्यापही आधारभूत धान्य खरेदी करणारे केंद्र सुरु झाले नाही त्यामुळे शेतकर्यांना नाइलाजास्व आपल्या धान्य कृषी उत्पन बाजार समितीत विकावा लागत आहे.
  गोंदिया जिल्यात आठ तालुक्यान पैकी सात तालुक्यात कृषी उत्पन्न बाजार समिती आहेत त्यामुळे आधार भूत किमतीने धान्य खरेदी करणारे केंद्र या वर्षी सुरु न झाल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीत धानाची आवक वाढली आहे .धान्य खरेदी विक्री करत असताना इलेक्ट्रानिक वजन काटे वापरावे अशा शासनाचा परीपत्रक असताना सुधा या ठिकाणी सध्या वजन काट्यांच्या सहायाने धान्य खरेदी केली जाते तेही गट्टू लागलेल्या मात्र यावर कृषी उत्पन्न बाजार समितीचा कुठलाही नियंत्रण नाही.  दिवाळी तोंडावर आली असल्याने शेतकरी कर्ज फेड्नी करिता नगदी पैशा मिळतो म्हणून कृषी उत्पन बाजार समितीत आपला धान्य विकतो मात्र कृषी उत्पन्न बाजार समितीत शासनाने जाहीर केलेल्या आधार भूत किमतीत धान्य खरेदी करणे शक्तीचे असताना सुधा या ठिकाणी कुठलेही सूचना फलक लावले नसल्याने शेतकरी व्यापरी मागेल त्या भावात धान्य विकायला मजबूर होऊन कमी किमतीत धान्य विकतो.
शेतकर्यांना वर्षभर कृषी उपज मालाची विक्री करता यावी म्हणून कृषी उत्पन बाजार समितीची निर्मिती केली आहे. या ठिकाणी शेतकऱ्याला धान्य विर्क्री करताना अडत्या मार्फत कमिशन देवून माल विकावा लागतो जेव्हा कि कृषी उत्पन्न बाजार समिती द्वारे शेतकर्यांना जर थेट आपला माल कृषी उत्पन्न बाजार समितीला कुठलाही कमिशन न देता विकायचा असेल तर त्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती कढून या ठिकाणी फ्री सेल नावाचा विभाग असतो मात्र दुर्दैवाने खाजगी व्यापार्यांना कृषी उत्पन्न बाजार समिती कडून फायदा पोहचविण्या करिता फ्री सेल विभागाचा प्रचार न झाल्याने मागील पाच वर्षात या फ्री सेल विभागत एक किलो शेती उपज घेण्यात आला नाही हे विशेष.
 आदीच धान पिक उत्पादन करताना खर्च जास्त आणि उत्पादन कमी असल्याने शेकार्याना शेती करणे परवडत नाही आणि त्यावर खाजगी व्यापार्यान कडून होणारी लुट थांबवावी म्हणून लवकरात लवकर आधारभूत किमतीने धान्य खरेदी करणारे केंद्र उघडावे अशी मागणी शेतकरी करत आहे