
मुंबई,५ – जागतिक स्तनपान सप्ताहाच्या अनुषंगाने तरंग सुपोषित महाराष्ट्राचा हा उपक्रम राज्यात रावबिला जात आहे. कोरोनाच्या संक्रमणाच्या काळात हा उपक्रम अखंडित सुरू राहावा आणि सुपोषण उत्तमरीत्या सुरू रहावे म्हणून राज्याच्या महिला व बालविकास विभागामार्फत या उपक्रमाच्या माध्यमातून लाभार्थ्यापर्यत पोचण्याचा प्रयत्न सरकारद्वारे केला जात आहे. यासाठी 8080809063 हा दूरध्वनी क्रमांक उत्तम माध्यम ठरत आहे.
यासंदर्भात बोलताना राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री एड. यशोमती ठाकूर म्हणाल्या की, “गेल्या वर्षी कोविड काळात माझ्या विभागाने डिजीटल प्लॅटफॉर्म वर मोठ्या प्रमाणावर काम केले. तरंग सुपोषित महाराष्ट्राचा या डिजीटल प्लॅटफॉर्म मुळे आपण सर्व गर्भवती महिला आणि स्तनदा मातांशी सातत्याने थेट संपर्कात आहोत. व्हाट्सअप चॅटबॉट तसंच आय व्हीं आर व्हॉइस कॉल्समुळे तत्काळ माहिती मिळवणं सोपे जात आहे. सक्षम महिला, सुदृढ बालक आणि सुपोषित महाराष्ट्र हे विभागाचे ब्रीद आहे, त्या दिशेने ही एक चांगली वाटचाल आहे. गेल्या वर्षी आपण देश पातळीवर पोषण अभियान अंतर्गत पोषण माह मध्ये पहिला क्रमांक मिळाला, सातत्याने नाविन्यपूर्ण उपक्रमांमुळे आपली पोषण चळवळ व्यापक होत आहे. तरंग सुपोषित महाराष्ट्राचा मुळे बाळाच्या पहिल्या १००० दिवसांमधली काळजी चांगल्या प्रकारे घेतली जात आहे. हा उपक्रम राबवणाऱ्या एकात्मिक बाल विकास सेवा योजना, राजमाता जिजाऊ मिशन आणि सर्व अंगणवाडी सेविका-पर्यवेक्षिका यांचे काम खरोखरच स्त्युत्य आहे.”
यावेळी प्रतिक्रिया व्यक्त करताना विभागाच्या प्रधान सचिव आय ए कुंदन म्हणाल्या, तरंग सुपोषण अभियानाच्या माध्यमातून राज्यभरात आय व्ही आर हेल्पलाइन, व्हाट्सअप चॅट बोट, ब्रॉडकास्ट फोन आणि संदेश प्रणाली तसेच एक घास मायेचा आजीबाईच्या गूजगोष्टी या माध्यमातून लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणे शक्य झाले आहे. महामारी च्या काळातही संभाव्य लाभार्थ्यांची संवाद सुरू ठेवण्यासाठी राज्य सरकारच्या महिला आणि बाल विकास विभागाचा तरंग सुपोशित महाराष्ट्राचा हा एक उत्कृष्ट डिजिटल उपक्रम आहे टेली न्यूट्रिशनच्या दिशेने हे एक महत्त्वाचं पाऊल आहे





