31.4 C
Gondiā
Sunday, June 14, 2026
Home विदर्भ उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले यांना भावपूर्ण निरोप

उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले यांना भावपूर्ण निरोप

0
217

blank

अर्जुनी-मोरगाव, दि.12 : प्रशासकीय सेवा म्हणजे ईश्वर सेवा. प्रशासकीय सेवेची जबाबदारी पार पाडताना समाजातील शोषित, पीडित घटकांशी सरळ संबंध येतो. या घटकांना न्याय देण्यात ईश्वरीय सेवेचा समाधान मिळतो. ही सेवा करण्याची संधी मला प्रथम गोंदिया जिल्ह्यात मिळाली. परिविक्षाधीन काळात सेवा देण्यासाठी या जिल्ह्यात यावे लागले. या तालुक्यात उपविभागीय अधिकारी म्हणून रुजू झाले. गोंदिया जिल्हा माझी कर्मभूमी आहे, असे भावोद्गार उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले यांनी काढले.

त्या स्थानिक वात्सल्य सभागृह येथे मंगळवार, १० आगस्ट रोजी महसूल विभागाच्यावतीने आयोजित निरोप समारंभाच्या कार्यक्रमात सत्कारमूर्ती म्हणून बोलत होत्या. सोनाले यांचे उपविभागीय अधिकारी म्हणून हिंगणघाट येथे स्थानांतरण झाले. त्या निमित्ताने महसूल विभागाच्यावतीने त्यांना निरोप देण्यात आला. या वेळी तहसीलदार विनोद मेश्राम, सडक-अर्जुनीच्या तहसीलदार उषा चौधरी, लाखांदूरचे तहसीलदार जयभारत मेश्राम, ठाणेदार महादेव तोदले, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.विजय राऊत, सेवानिवृत्त अप्पर जिल्हाधिकारी कमलेश सोनाले आणि त्यांच्या सौभाग्यवती, सेवानिवृत्त गटविकास अधिकारी यु.टी. राठोड उपस्थित होते.

तहसीलदार विनोद मेश्राम यांनी प्रास्ताविकातून सोनाले यांच्या गत तीन वर्षांचा लेखाजोखा मांडला. उपस्थित कर्मचाऱ्यांनी सोनाले यांच्या कार्यकाळाबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या. महसूल विभागाच्यावतीने उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले यांना कर्मचाऱ्यांनी भेटवस्तू देऊन शुभेच्छा दिल्या.संचालन व आभार प्रा.अनिल मेश्राम यांनी केले. कार्यक्रमासाठी मंडळ अधिकारी पुंडलिक कुंभरे, तलाठी श्रीधर चचाने, प्रकाश वैद्य, लिलेश्वर टेंभरे, पी.यू. ताकसंडे, सुरेश हरिनखेडे यांनी सहकार्य घेतले.