35.7 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home महाराष्ट्र स्वातंत्र्याच्या  अमृत महोत्सवी  वर्षात आकाशवाणीचा वृत्तविभाग घेणार प्रश्नमंजुषा स्पर्धा

स्वातंत्र्याच्या  अमृत महोत्सवी  वर्षात आकाशवाणीचा वृत्तविभाग घेणार प्रश्नमंजुषा स्पर्धा

0
52

blank

#  प्रत्येक सोमवारी बातमीपत्रात विचारला जाणार प्रश्न

मुंबई: भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव दि.15 आगस्ट 2021 ते 15 आगस्ट 2022 या काळात वर्षभर  साजरा करण्यात येणार आहे.  या अमृत महोत्सवानिमित्ताने आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्तविभागाने प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित केली आहे . स्वातंत्र्य संग्रामातील महत्त्वाच्या बाबींविषयी समाजात औत्स्युक्य निर्माण व्हावं , ऐतिहासिक स्मृतींना उजाळा मिळावा आणि समाजमनात त्यांचं स्थान कायम रहावं , या उद्देशाने ज्ञान प्रबोधनासाठी ही स्पर्धा दि.  १६ ऑगस्टपासून आयोजित करण्यात आली आहे . या स्पर्धेसाठी आकाशवाणीच्या बातमीपत्रातून दर सोमवारी एक प्रश्न विचारला जाणार आहे. विचारलेल्या प्रश्नाचे योग्य उत्तर  स्पर्धकांनी  आकाशवाणीच्या प्रादेशिक वृत्तविभागाकडे ई – मेलद्वारा पाठवायचे आहे . [email protected] या ई – मेल पत्त्यावर स्पर्धकांनी उत्तर पाठवावे . सर्वप्रथम योग्य उत्तर देणाऱ्या यशस्वी स्पर्धकाचे नाव शुक्रवारच्या बातमीपत्रातून प्रसारित करण्यात येतील .तसेच  आकाशवाणीच्या फेसबुक , ट्विटर या  सोशल मिडियाच्या प्लॅटफॉर्मवरही फोटोसह  ती नाव प्रकाशित  हे  करण्यात येतील त्याच बरोबर  प्रशस्तीपत्रक देऊन विजेत्यांचा  सन्मान करण्यात येईल . तरी श्रोत्यांनी  या स्पर्धेत अधिकाधिक संख्येने सहभागी व्हावे असे  आवाहन आकाशवाणी मुंबईच्या वृत्तविभागप्रमुख सरस्वती कुवळेकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे .

blank