
नवेगावबांध( अर्जुनी-मोर)–कृषी विभाग गोंदिया व जीएसपी यांच्या संयुक्त विद्यमाने कीटकनाशके फवारणी करताना घ्यावयाची काळजी जनजागृती मोहिमेची सुरुवात नवेगावबांधचे सरपंच अनिरुद्ध शहरे यांच्या शुभहस्ते रथाचे पूजन करून करण्यात आले.याप्रसंगी उपसरपंच रघुनाथ लांजेवार अध्यक्षस्थानी होते .याप्रसंगी नवेगावबांध कृषी मंडळ अधिकारी कुमुदिनी बोरकर,पर्यवेक्षक राजू संग्रामे ,कृषी पर्यवेक्षक प्रकाश मेश्राम, कृषी सहाय्यक योगेश मोहतुरे भिवखिडकी , मोतीलाल येळणे प्रतापगड,सागर होलगिरे केशोरी,विकास मदने गोठणगाव,कामिनी गायकवाड चान्ना/बाकी,लोकेश चांदेवार नवेगाव/बांध,भोजराज नखाते देवलगाव,मिलिंद मोरे पवनी/ धाबे,प्रकाश वासनिक सिरेगाव/बांध आदी कृषी अधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते .
याप्रसंगी कीटकनाशक फवारणी करतांनी तथा वापर करताना घ्यावयाची काळजी उपस्थित शेतकऱ्यांना फिरत्या रथाच्या द्वारे जनजागृती करण्यात आली.याप्रसंगी नवेगावबांधचे कृषी मित्र बाळू डोंगरवार, हुसेन नंदागवळी, हना टेम्भूर्णे, मदन मेश्राम ,अभिमन कापगते ,प्रयोगशील शेतकरी सतिश कोसरकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते.सदर जनजागृती रथ चान्ना/कोडका, देवलगाव ,कुंभीटोला, बाराभाटी ,कवठा, खैरी ,सुकडी, अर्जुनी-मोर ,ताडगाव ,झरपडा, करडगाव ,अरत्तोंडी ,निमगाव, दाभना, बोंडगाव /देवी आदी गावांमध्ये फिरून शेतकऱ्यांना औषध फवारणी करतांनी घेण्याच्या काळजीबाबत जनजागृती करण्यात आली.