
वाशिम, दि. २३ : राज्यातील युवक-युवतींसाठी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तालयामार्फत ‘स्वयंरोजगार सुरु करताना कोणती काळजी घ्याल?’ या विषयावर शुक्रवार, २४ सप्टेंबर रोजी ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील युवक-युवतींनी या वेबीनारचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त सुनंदा बजाज यांनी केले आहे.
‘स्वयंरोजगार सुरु करताना कोणती काळजी घ्याल?’ या विषयावरील वेबीनारमध्ये शुक्रवार, २४ सप्टेंबर रोजी दुपारी ३ ते ४.३० या वेळेत लाईफ-बिझनेस कोच, प्रसिद्ध वक्ते, लेखक विनोद अनंत मेस्त्री व उस्मानाबाद येथील एसबीआय-आरसेटीचे विकास गोफणे हे मार्गदर्शन करणार आहेत. इच्छुकांना https://www.facebook.com/MaharashtraSDEED या फेसबुक पेज किंवा https://www.youtube.com/channel/UC7o2gQB5q7VaITABN4FHw1A या यु-ट्यूब लिंकच्या सहाय्याने वेबीनरमध्ये सहभागी होता येणार आहे.
जिल्ह्यातील युवक-युवतींना या सत्रात सहभागी होण्यामध्ये काही अडचणी असल्यास ०७२५२-२३१४९४ या क्रमांकावर अथवा जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, वाशिम या कार्यालयाशी संपर्क करावा, असे आवाहन श्रीमती बजाज यांनी केले आहे.



