35.9 C
Gondiā
Saturday, June 13, 2026
Home विदर्भ खातेदार व शेतकऱ्यांचे हित हेच बँकेचे धोरण – अध्यक्ष सुनील फुंडे

खातेदार व शेतकऱ्यांचे हित हेच बँकेचे धोरण – अध्यक्ष सुनील फुंडे

0
47

blank

जिल्हा बँकेची ऑनलाईन आमसभा

भंडारा : भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही सर्वसामान्यांची बँक आहे . खातेदार व शेतकऱ्यांचे हित साध्य करणे हेच बँकेचे मुख्य धोरण आहे.संस्था टिकवायच्या असतील तर बँक सुस्थितीत राहीली पाहिजे , असे मत जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे यांनी व्यक्त केले .

कोरोना महामारीमुळे प्रशासनाने घालून दिलेल्या नियमामुळे नागरिकांना एकत्र येण्यावर बंदी घातली असल्यामुळे जिल्हा बँकेची वार्षिक आमसभा प्रथमच ऑनलाईन घेण्यात आली . जिल्हा बँकेच्या मुख्य कार्यालयात दि . २६ सप्टेंबर २०२१ रोजी ऑनलाईन आमसभा घेण्यात आली . यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे हे आमसभेला मार्गदर्शन करीत होते .दुस-यांदा पार पडलेल्या आभासी आमसभेला बँकेचे संचालक डॉ . प्रकाश मालगावे , योगेश हेडाऊ , धनंजय दलाल , रामलाल चौधरी व सहाय्यक निबंधक देशपांडे उपस्थित होते . अध्यक्ष सुनिल फुंडे , पुढे म्हणाले , सन २००५-०६ पासून बैंक सतत , निवळ नफ्यात आले . चालवर्षी बँकेला रु . २७३ . २७ लक्ष निव्वळ नफा झाला आहे . महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार शासकीय कार्यालय , सार्वजनिक उपक्रम व महामंडळे यांचे बँकींग व्यवहार हाताळण्यासाठी राज्यातील १५ जिल्हा बँकांची निवड झाली त्यात . त्या भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा समावेश आहे .

बँकेच्यावतीने मोबाईल एटीएम वहन २० जानेवारी २०२१ पासून कार्यान्वित करण्यात आली आहे . भंडारा , साकोली , पवनी व तुमसर येथे शेतकन्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आर्थिक साक्षरता केंद्र स्थापन करण्यात आले आहे . शेतकन्यांच्या हितासाठी विविध योजनांतर्गत कर्ज देण्यात येत आहे . २० ठिकाणी ए . टी . एम . सेवा सुरु आहे .

blankबँकेचे विभाजन झाल्यानंतर २००६ मध्ये एकूण भागभांडवल रु . १०.४१ कोटी व ठेवी रु . २६३.१७ कोटी होते . आता एकूण भागभांडवल ४०.४६ कोटी व एकूण ठेवी १३२५.४२ कोटी आहेत . पुढील वर्षी १४०० कोटी रुपयांच्या बँकेत ठेवी असतील , अशी अपेक्षा फुंडे यांनी व्यक्त केली .
सन २०२१-१२ च्या खरीप हंगामासाठी बँकेला रु . २८०.७८ कोटीचे लक्ष्यांक प्राप्त झाले आहे . त्यापैकी एकूण ७० ३७८ सभासदांना रु . ३५०.५४ कोटी कर्जवाटप करण्यात केलेले आहे . त्यापैकी ५२०३२ सभासदांनी प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा भाग घेतला असून त्यांच्याकडून रु . ३.९ ८ कोटीचे प्रिमीयम वसूल करण्यात आले आहे . दि . ३० जुन २०२१ अखेर बँक स्तरावर शेती कर्जाची वसुली ५३.३८ टक्के झाली आहे . प्रधानमंत्री पिकविमा योजनेंतर्गत शासनाने सन २०२१-२२ या हंगामाकरीता एचडीएफसी ऑग्रो या कंपनीला नियुक्त केले .

आर्थिक वर्षात बँकेचा ढोबळ एन . पी . ए . १ ९ .४० टक्के असून निव्वळ २०.९ ६ टक्के आहे . बँकेला ‘अ’ वर्ग मिळालेला आहे.सन २००७-०८ ते सन २०१६-१७ पावेतो मार्केटिंग फेडरेशनकडून खड्या हुंडयावरील व्याजाचे एकूण रु . ५६१.११ लक्ष अद्यापही मिळाले नसल्याची माहिती सुनील फुंडे यांनी दिली . त्यामुळे शासनाच्या योजना राबविताना बँकेचे हित कसे सांभाळावे हा प्रश्न संचालक मंडळासमोर येत असतो . यामुळे रु . ५६१.११ लक्षचे नुकसान होण्याची शक्यता असल्याचेही ते म्हणाले.

बँकेला संलग्न असलेल्या एकूण ३६८ सेवा सहकारी संस्थापैकी चालु वर्षात ३३८ संस्था अनिष्ट तफावतीत असून त्याची एकूण रक्कम रु . १०२ कोटी आहे . यावर फुंडे यांनी चिंता व्यक्त केली .
या आमसभेत अनेक विषयांना सर्वानुमते मंजुरी प्रदान करण्यात आली तसेच आर्थिक वर्षातील जमाखर्चाला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली .

“बँकेला सन २०२०-२१ या वर्षात पिक कर्जवाटपाचे शासनाकडून प्राप्त उदिष्ट रू . २६० कोटीचे होते . दि . ३० सप्टेंबर २० पर्यंत बँकेने ७४७११ सभासदांना रु . ३१४१५.६४ लक्ष पिककर्ज वाटप केलेले आहे . मागील वर्षांपेक्षा ह्यातील सर्वात महत्वाची बाब म्हणजे जास्त कर्जवाटप करण्याचा प्रयत्न करून जिल्हयातील गरजू शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला आहे . बँकेने आजापर्यंत केलेले संपुर्ण कर्जवाटप स्वनिधीमधूनच केले आहे, हे विशेष.”

” येत्या हंगामात शेतक-यांसाठी दिलासादायक बाब म्हणजे क . ३.०० लक्ष पिककर्ज घेणाऱ्या सभासदांवर कोणत्याही प्रकारची व्याजाची आकारणी होणार नाही . कारण केंद्रशासनाप्रमाणेच राज्यशासनाने सुदा ३.०० लक्ष कर्जावर शून्य टक्के व्याजदाराने आकारणी होणार असल्याचे कळविले आहे . त्यामुळे प्रत्येक कर्जदार शेतकऱ्याने आपल्या संस्थेची चालू व थकित कर्जाची १०० टक्के वसुली करून आपल्या संस्थेला मदत करावी , असे आवाहन अध्यक्ष सुनील फुंडे यांनी केले.”
“कोरोना काळात बँकेच्या चार कर्मचाऱ्यांचे निधन झाले. त्यापैकी तिन कुटुंबातील अर्ज नोकरीसाठी आले होते. त्यांना कामावर घेण्यात आले आहे. एकाचा अर्ज येताच त्याला घेण्यात येईल, असेही फुंडे म्हणाले.”