31.4 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home विदर्भ गडचिरोली जिल्हा हागणदारीमुक्त करूया-कुमार आशीर्वाद

गडचिरोली जिल्हा हागणदारीमुक्त करूया-कुमार आशीर्वाद

0
25

गडचिरोली-भारताच्या 75 व्या स्वातंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त गडचिरोली जिल्ह्यामध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.  नुकताच “सरपंच स्वच्छता संवाद” या चर्चात्मक संवाद उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. “स्वच्छता ही गडचिरोलीची संस्कृती असून गावाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहचून मार्च 2024 अखेर गडचिरोली जिल्हा हागणदारीमुक्त अधिक (ODF Plus) करूया” असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मा. कुमार आशीर्वाद यांनी सरपंचांशी संवाद साधला आहे. जिल्ह्यात प्लास्टिक प्लास्टिक, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन, 100% सार्वजनिक व वयकतिक शौचालय बांधकाम पूर्ण करून जिल्ह्याला स्वच्छ, सुंदर करावयाचे आहे.
तसेच राज्यस्तरावरील प्रकल्प संचालक मा. राजेंद्र शिंदे साहेब यांनी थेट गडचिरोली जिल्ह्यातील सरपंच सोबत संवाद साधले उपक्रमांचे प्रास्ताविक उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पावस्व) .माणिक चव्हाण यांनी केले. तसेच जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष,उपक्रमांबद्दल माहिती दिली. या संवाद उपक्रमाला जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींचे सरपंच ग्रामसेवक जिल्हा परिषदेचे पदाधिकारी सदस्य पंचायत समिती चे सभापती उपसभापती व सर्व सदस्य गटविकास अधिकारी विस्ताराधिकारी ग्रामसेवक/ग्रामविकास अधिकारी गटसमन्वयक समुह समन्वयक , जिल्हा कक्षातील सल्लागार व तज्ञ हे उपस्थित होते