40.3 C
Gondiā
Saturday, June 13, 2026
Home विदर्भ बाजार समितीच्या मार्केट यार्डात नवीन कृषीउत्पादित मालाची आवक सुरू

बाजार समितीच्या मार्केट यार्डात नवीन कृषीउत्पादित मालाची आवक सुरू

0
49

blank

कृषीउत्पादित माल : शेतकर्‍यांसह खरेदीदारांचाही सत्कार

  • सायकल व चांदीचा शिक्का भेट 

तिरोडा, दि.28 : स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात नवीन कृषीउत्पादित मालाची आवक सुरू झाली आहे. याप्रसंगी प्रथम माल आणणार्‍या शेतकर्‍यांचा व खरेदीदाराचाही शाल, श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला.

सविस्तर वृत्त असे की, वेगवेगळ्या गावातील तीन शेतकर्‍यांनी आज मंगळवार, 28 सप्टेंबर रोजी एकाच दिवशी नवीन धान विक्रीसाठी आणले. तिरोडा कृषी उत्पन्न बाजार समितीत सर्वप्रथम आपले नवीन धान विक्रीसाठी चांदोरी खुर्द येथील शेतकरी सुरेन्द्र महेशराम अंबुले यांनी आणले. बाजार समितीचे सभापती डॉ.चिंतामन रहांगडाले, संचालक ओमप्रकाश पटले, संजय कोठे, जयप्रकाश गौतम, दिनेश चोभरे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ देवून त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच त्यांना सायकल भेट देण्यात आली. सदर शेतकर्‍याचे धान अडत्या जयप्रकाश गौतम यांच्याद्वारे विक्री होवून व्यापारी काजल ट्रेडर्समार्फत जयेंद्र मेश्राम यांनी 2 हजार 222 रुपये प्रतिक्विंटल दराने खरेदी केले. त्याबद्दल त्यांचाही शाल श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला.

तसेच ग्राम नवेझरी येथील शेतकरी कृष्णा सुखादेव कापगते यांनी आपले कृषीउत्पादित रुची धान विक्रीसाठी आणले. बाजार समितीच्या वतीने शाल, श्रीफळ देवून त्यांचा सत्कार करून चांदीचा शिक्का भेट देण्यात आला. त्यांचे धान अडत्या तेजराम टेंभरे यांच्याद्वारे विक्री होवून व्यापारी संदेश साठवणे यांनी सर्वोत्तम 2 हजार 751 रुपये प्रतिक्विंटल दराने खरेदी केले. त्याबद्दल त्यांचाही शाल, श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला.

त्याचप्रमाणे ग्राम लेदडा येथील शेतकरी माणिक उरकुडा ठाकरे यांनी आपले कृषी उत्पादित बाहुबली धान विक्रीसाठी आणले. त्यांचाही शाल, श्रीफळ व चांदीचा शिक्का देवून सत्कार करण्यात आला. त्यांचे धान अडत्या राहुल कन्वासिंग, सुरेश घुरकेलाल असाटी यांच्यामार्फत विक्री होवून व्यापारी यशोदा ट्रेडर्सच्या वतीने कुणाल शहारे यांनी खरेदी केले. त्यांचाही शाल, श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला.यावर्षीच्या नवीन पिकाला प्रथम विक्रीसाठी आणणार्‍या शेतकर्‍यांच्या सत्कार सोहळ्यात प्रामुख्याने बाजार समितीचे सर्व संचालक, प्र.सचिव, कार्तिक बिसेन, सर्व कर्मचारी, अडत्या, व्यापारी आदि उपस्थित होते.