43.5 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home रोजगार/व्यापार ४२५ युवक-युवतींना रोजगाराबाबत प्रशिक्षण

४२५ युवक-युवतींना रोजगाराबाबत प्रशिक्षण

0
32

blank

गडचिरोली- जिल्हा पोलिस दलाच्यावतीने पोलिस अधीक्षक अंकीत गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या पोलिस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून गरजू युवक-युवतींना रोजगारांची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सोमवार २७ सप्टेंबर रोजी पोलिस मुख्य परिसरातील एकलव्य धाम येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाच्यात ४२५ युवक-यवुतींना रोजगाराचे प्रशिक्षण देण्यात आले.
सदर रोजगार मेळाव्यात हॉस्पीटॅलिटी, ऑटोमोबाईल व इलेक्ट्रीशियन प्रशिक्षणाकरित जिल्ह्यातील दुर्गम व अतिदुर्गम भागातील ४२५ बेरोजगार युवक-युवती सहभागी झाल्या होत्या. त्यांना नियुक्ती प्रमाणपत्राचे वाटप व सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले. एज्युकेशन फॉऊंडेशन मार्फत हॉस्पिटॅलिटी प्रशिक्षणाकरिता निवड झालेल्या उमेदवारांना यवतमाळ, ऑटोमोबाईल प्रशिक्षणाकरिता निवड झालेल्या उमेदवारांना अहमदनगर तसेच इलेट्रीशियन प्रशिक्षणाकरिता निवड झालेल्या उमेदवारांना अहमदनगर व औरंगाबद येथे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
प्रशिक्षणाकरिता निवड झालेल्या उमेदवारांचे पोलिस अधीक्षक अंकीत गोयल यांनी केले व उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. मार्गदर्शन करताना पोलिस अधीक्षक गोयल म्हणाले, सन २0२१ या वर्षाच्या सुरुवातीपासून पोलिस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून आतापर्यंत जिल्ह्यातील हजारो आदिवासी बाधवांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून दिला आहे. तसेच हजारो युवकांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या विविध संधी मिळवून दिल्या आहे. प्रशिक्षणार्थींनी मिळालेल्या संधीचे सोने करावे असे ते म्हणाले.
कार्यक्रमास अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) समीर शेख, अपर पोलिस अधीक्षक (अभियान) सोयम मुंडे, अहेरीचे अपर पोलिस अधीक्षक अनुज तारे, पोलिस उपअधीक्षक (अभियान) भाऊसाहेब ढोले व प्रमुख अतिथी म्हणून प्रथम एज्युकेशन फॉऊंडेशनचे प्रमुख क्लस्टर हेड आशिष इंगळे, रिजनल अकॅडेमिक हेड हॉस्पीटॅलिटी टिमच्या भाग्यश्री देशमुख उपस्थित होते.

blank