गोरेगांव,दि.03 – तालुक्यातील मोहाडी येथील आदर्श सार्वजनिक वाचनालय ( तालुका ” अ” दर्जा ग्रंथालय)चा 40 वा वर्धापण दिन व महात्मा गांधी आणि लालबहादुर शास्त्री जयंती समारोह उत्साहात साजरा करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी सभापती डॉ.लक्ष्मण भगत होते. उद्घाटक म्हणून भंडारा जिल्हा ग्रंथालय अधिकारी खुमेन्द्र बोपचे होते.प्रमुख पाहुणे म्हणून माजी सभापती विश्वजित डोंगरे,जे.डी.जगणित गुरूजी,धुर्वराज पटले,सुरेश चौधरी, श्रीरामजी पारधी,संस्थेचे अध्यक्ष ग.तु.पटले,संस्थेचे संस्थापक सचिव ग्रंथमित्र वाय.डी.चौरागडे,उपाध्यक्ष मदनलाल बघेले,रविन्द्र वाचनालय चोपा सचिव बि.बी.बहेकार व सर्व सदस्य उपस्थित होते.
ग्रंथालय सचिव चौरागडे यांनी 40 वर्षातील ग्रंथालय विकासाच्या संपूर्ण प्रगती अहवाल प्रास्ताविकात सादर केले.कार्यक्रमाचे उद्घाघाटक खुमेन्द्र बोपचे यांनी ग्रंथालय विकासाबाबद खुप प्रंशसनिय कार्य केल्याचा उल्लेख केला.माझा आणि ग्रंथालयाचा अतिशय जवळचा संबंध असुन प्रगतीबाबद अपेक्षा बाळगली पाहिजे असे विचार मांडले. तसेच जे डी जगणित यांनी विविध उदाहरणे देऊण मनुष्य ग्रंथालयाच्या माध्यमातुन आपला विकास करू शकतो तसेच अधिकाधिक ग्रंथ वाचण करावे व आपली प्रगती साधावी असे मार्गदर्शन केले.विश्वजित डोंगरे यांनीही ग्रंथालयाच्या कार्याची प्रशंसा केली.अध्यक्षीय भाषणात डॉ लक्ष्मन भगत यांनी ग्रंथालयाचा जास्तीत जास्त फायदा घेऊन ग्रंथालयातील ग्रंथाचे वाचण तरूणवर्गाने करूण स्वतःचा,गांवाचा विकास साधवा असे आवाहण केले.कार्यक्रमाचे संचालन वाय.एफ.पटले यांनी केले तर आभार नरेन्द्रकुमार चौरागडे यांनी मानले.यावेळी संस्थेचे सदस्य हिरालाल महाजन,जे.जे.पटले,चंन्द्रकुमार चौरागडे,देवदास चचाने,सुभास चौरागडे,दुर्गेश चेचाने,कुल्लु वरखडे आदीनी सहकार्य केले.





