42.4 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home गुन्हेवार्ता मोबाईलवर क्रिकेट जुगार खेळणाऱ्यांवर कार्यवाही,एका बुकीला अटक

मोबाईलवर क्रिकेट जुगार खेळणाऱ्यांवर कार्यवाही,एका बुकीला अटक

0
59

blank

तिरोडा, –ड्रीम गार्डन लॉनच्या बाजूला आणि त्रिमूर्ती पान प्यालेसच्या मागे काही मुले मोबाईलवर ऑनलाईन क्रिकेट जुगार खेळत असल्याची माहिती बुधवारी रात्री मिळाली. यावरून उप विभागीय पोलीस अधिकारी नितीन यादव तिरोडा यांच्या मार्गदर्शना खाली छापा टाकला. त्यामध्ये (1)सुजल विजय सुधारानी (2) केशव राजकुमार धामेचा (3) आयुष सोमेन्द्र उपवंशी (4) भूषण वेणुधर सूर्यवंशी (5) एक विधी संघर्ष बालक सर्व रा. चुरडी फाटा तिरोडा हे सापडले.
हैद्राबाद -बंगलोर या चमू दरम्यान सुरु असलेल्या IPL ऑनलाईन क्रिकेट जुगार मोबाईलवर खेळतांना आढळून आले. त्यांच्या जवळून ऑनलाईन क्रिकेट जुगार खेळत असलेले एकूण 5 मोबाईल कि 48000/- रुपये चा मुद्धेमाल जप्त करण्यात आला. त्यांच्या व 3 खायवाल यांचे विरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सदरची कार्यवाही पोहवा भाटिया, पोशी दमाहे, बिसेन, मोहित यांनी केली.

दुबई येथे सुरू असलेल्या आयपीएल स्पर्धेवर ऑनलाईन जुगार खेळणार्‍या शहरातील एका बुकीला आज शुक्रवारी स्थानिक पोलिसांनी ताब्यात घेत 26 हजार रुपये किमतीचे तिन मोबाईल हस्तगत केले. राम सणपाल लताराम सणपाल (41) रा. स्टेट गांधीवॉर्ड तिरोडा असे आरोपी बुकीचे नाव आहे.
तिरोडा पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार बुधवार 6 ऑक्टोबर रोजी रात्री 11 वजताच्या सुमारास शरातील ड्रीम गार्डन लॉनच्याचे बाजूला त्रिमूर्ती पान पॅलेसच्या छापामार कारवाई करून मोबाईलवर ऑनलाईन आयपीएल क्रिकेट स्पर्धेवर जुगार खेळणार्‍या 5 आरोपींना ताब्यात घेतले होते.सदर गुन्ह्यात आज आरोपी राम सणपाल लताराम सणपाल या क्रिकेट बुकीला अटक करण्यात आली आहे. त्याच्या ताब्यातुन 26 हजार रुपये किमतीचे 3 मोबाईल जप्त करण्यात आले. सदर गुन्ह्यात आणखी एका बुकीला अटक होण्याची श्यक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

blank