गोंदिया, दि.10 : नेहरु युवा केंद्राच्या वतीने जिल्हा युवा कार्यक्रम सल्लागार समितीची सभा
4 ऑक्टोंबरला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात निवासी उपजिल्हाधिकारी जयराम देशपांडे
यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
सभेला नेहरु युवा केंद्राच्या जिल्हा युवा अधिकारी सदस्य सचिव श्रुती डोंगरे, समितीचे सदस्य
म्हणून अग्रणी जिल्हा प्रबंधक , जिल्हा माहिती अधिकारी यांचे प्रतिनिधी
के.के.गजभिये, जिल्हा क्रीडा अधिकारी यांचे प्रतिनिधी श्री तपासे, प्रा.बबन मेश्राम, श्रीमती संगीता
घोष, रितुराज यादव, छबीलाल बोरकर, मेघा मालडोंगरे व विशाल रेखारकर उपस्थित होते.
श्री देशपांडे यावेळी म्हणाले, शासकीय कार्यालयात पत्रव्यवहार करतांना स्वातंत्र्याचा अमृत
महोत्सव बाबत लोगो वापरण्यात यावा. नेहरु युवा केंद्राच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवून
व्यापक प्रमाणात जनजागृती करण्यात यावी असे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी नेहरु युवा केंद्राच्या जिल्हा युवा अधिकारी श्रुती डोंगरे यांनी सन 2021-22 च्या
वार्षिक कृती आराखड्याबद्दल सविस्तर माहिती विशद केली.
अग्रणी जिल्हा प्रबंधक यांनी बँक मित्र बनविण्याच्या योजनेबद्दल माहिती देवून
अधिक माहितीसाठी रुरल सेल्फ एम्प्लॉयमेन्ट ट्रेनिंग इन्स्टीट्यूटला संपर्क करायचे सांगितले.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी जयराम देशपांडे यांच्या हस्ते ‘कॅच द रेन फेज-2’ मोहिमेची
सुरुवात करण्यात आली. सभेला उपस्थित सर्व उपस्थितांचे आभार नेहरु युवा केंद्राच्या जिल्हा युवा
अधिकारी श्रुती डोंगरे यांनी मानले.





