गोंदिया, दि.10 : नेहरु युवा केंद्र व खेल मंत्रालय भारत सरकार द्वारे जिल्हा क्रीडा संकुल गोंदिया
येथे 2 ऑक्टोंबर रोजी महात्मा गांधी यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमास प्रमुख
अतिथी म्हणून अप्पर जिल्हाधिकारी राजेश खवले, राजीव गांधी समाजकार्य महाविद्यालयाच्या
संगीता घोष, भारत स्काऊट-गाईडचे श्री तपासे, जिल्हा युवा अधिकारी श्रुती डोंगरे उपस्थित होते.
प्रारंभी अप्पर जिल्हाधिकारी राजेश खवले यांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला
पुष्पहार अर्पण करुन व दीप प्रज्वलीत करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी उपस्थित
सर्व स्वयंसेवकांना मान्यवरांच्या हस्ते टी शर्ट वितरीत करण्यात आले.
यावेळी अप्पर जिल्हाधिकारी राजेश खवले मार्गदर्शन करतांना म्हणाले, गांधीजींचे विचार
अवगत करुन आपले जीवन उज्ज्वल करावे असे त्यांनी सांगितले. श्री तपासे यांनी भारत स्काऊट-
गाईड विषयी आपले विचार व्यक्त करुन सामाजिक कार्यात सहभागी होण्यास प्रवृत्त केले. संगिता
घोष यांनी सांगितले की, नेहरु युवा केंद्राच्या माध्यमातून सामाजिक कार्याबाबत विविध उपक्रम
राबविण्यात येतात त्याबद्दल त्यांनी विस्तृतपणे माहिती दिली. श्रुती डोंगरे आपल्या मार्गदर्शनात
म्हणाल्या, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्वाअंतर्गत 1 ऑक्टोंबर ते 31 ऑक्टोंबर पर्यंत नेहरु युवा
केंद्रामार्फत स्वच्छ भारत मिशन राबविण्यात येत असून त्यासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षीत आहे असे
त्यांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवा एकता क्रीडा बहुउद्देशीय संस्था गोंदियाचे अध्यक्ष ऋतुराज यादव
यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्नेहदिप कोकाटे, विनेश फुंडे, तोपेश सावरकर, छबीलाल
बोरकर व देव्यकुमार राऊत यांनी सहकार्य केले.





