नवेगावबांध येथे महामार्ग वाहतूक पोलिसांचे प्रबोधन

0
29

संतोष रोकडे/अर्जुनी-मोर,दि.11- अर्जुनी-मोर तालुक्यातील नवेगाव बांध येथे दिनांक 10 ऑक्टोंबर ला महामार्ग पोलीस केंद्र डोंगरगाव जिल्हा गोंदिया यांच्या वतीने रस्त्यांवर होणारे अपघात कमी करण्याच्या दृष्टीने प्रबोधन कार्यक्रम घेण्यात आले. महामार्ग सुरक्षा पथक महाराष्ट्र राज्य मुंबई चे अप्पर पोलीस महासंचालक भूषण कुमार उपाध्याय, पोलीस अधीक्षक श्वेता खेडकर, पोलीस उपअधीक्षक संजय पांडे व पोलीस निरीक्षक श्रीमती वैरागडे यांच्या मार्गदर्शनाखाली महामार्ग पोलीस केंद्र डोंगरगाव येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत भुते पोलीस उपनिरीक्षक दिनेश लिल्हारे व पोलीस शिपाई विलास नेरकर यांनी नवेगाव बांध राष्ट्रीय उद्याला समोरील रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना थांबवून वाहनचालक व नागरिकांना वाढते अपघाताचे वाढते प्रमाण कमी करण्याच्या दृष्टीने वाहतूक नियमांचे पालन करण्यास संबंधाने माहिती देऊन प्रबोधन करण्यात आले यावेळी 60 ते 70 वाहनचालक व नागरिक उपस्थित होते. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत भुते यांनी वेगाने गाडी न चालवणे, वाहन चालकाने सोबत लायसन्स व गाडी संबंधाने कागदपत्र नेहमी सोबत ठेवावे, हेल्मेट घालावे, सीट बेल्ट लावावे या संबंधाने मार्गदर्शन केले.