गोंदिया : भारतीय बौद्ध महासभेच्या जिल्हा कार्यकारिणीची बैठक शनिवार, 9 ऑक्टोबर रोजी शासकीय विश्राम गृह गोंदिया येथे पार पडली. यात मीरावंत हॉस्पिटलचे संचालक डॉ.राजेंद्र वैद्य यांची जिल्हा मुख्य संघटकपदी (वैद्यकीय विभाग) नियुक्ती करण्यात आली. त्यांचे उपस्थित सर्वांनी अभिनंदन केले.
सदर बैठकीमध्ये गोंदिया जिल्ह्याच्या कार्यकारिणीत प्रत्येक तालुक्यातून दोन प्रतिनिधी जिल्हा कमिटीत घेण्यात येतील. तसेच तालुका कमिटी विस्तारीकरीकरण याबाबत चर्चा करण्यात आली. तालुका कमिटीत प्रत्येक गावातील दोन किंवा तीन प्रतिंनिधी घेण्यात यावे व तालुका कार्यकारिणी लवकरात लवकर गठित करण्यात यावी. यात महिलांचाही समावेश करण्यात यावा, असे ठरविण्यात आले.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा अध्यक्ष महेंद्र मेश्राम होते. याप्रसंगी प्रामुख्याने महासचिव चन्द्रशेखर चव्हाण, उपाध्यक्ष नरेश मेश्राम, उपाध्यक्ष कामिनी गणवीर, कोषाध्यक्ष जितेंद्र घरडे, प्रवक्ता प्रफुल भालेराव, मुख्य संघटक महेंद्र चौरे, सचिव भागवत पटले, संघटक आदेशकुमार फुले, जिल्हा मुख्य संघटक (वैद्यकीय विभाग) डॉ.राजेंद्र वैद्य उपस्थित होते.
तसेच गोंदियाचे तालुका अध्यक्ष विनोद चव्हाण, तिरोडा तालुका अध्यक्ष देवानंद शहारे, इंजिनीअर रवी राऊत, गोंदिया शहर अध्यक्ष धिरजकुमार गेडाम, सडक-अर्जुनीचे तालुका अध्यक्ष पुण्यशील कोटांगले, प्रवीण बोरकर, कन्हारटोला-काटीचे डॉ.भास्कर रायकर, गोंडीटोलाचे रंजीत वासनिक, सावरीचे योगेंद्र सहारे, धामणगावच्या कविता बागडे आदि उपस्थित होत्या.
याप्रसंगी तालुक्याची कार्यकारिणी गठित करताना कोणकोणत्या बाबींची काळजी घ्यावी, कोणत्या व्यक्तींचा समावेश करावा तसेच इतर अनेक बाबींवर जिल्हाध्यक्ष महेंद्र मेश्राम यांनी मार्गदर्शन केले. डॉ.राजेंद्र वैद्य यांनी आजच्या काळात भारतीय बौद्ध महासभेची गरज व समाज संघटन या विषयांवर मार्गदर्शन केले. तर प्रवक्ता प्रफुल भालेराव यांनी, समाजात कार्य करीत असताना आपले आचरण व व्यवहार कसे असावे, यावर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महासचिव चन्द्रशेखर चव्हाण यांनी मांडले. संचालन व आभार जिल्हा प्रवक्ता प्रफुल भालेराव यांनी मानले. बैठकीसाठी भारतीय बौद्ध महासभेच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.