बचतगटाच्या महिलांनी तयार केलेल्या वस्तूंची खरेदी करा : जिल्हाधिकारी

0
34

गोंदिया, दि.11 : महिला आर्थिक विकास महामंडळाच्या मार्गदर्शनाखाली उत्कर्ष लोकसंचालित
साधन केंद्र गोंदिया व नाबार्ड अर्थ सहाय्याने शितला माता मंदिर चौक, सिव्हील लाईन, गोंदिया येथे
सुरु असलेल्या ग्रामीण व्यापार केंद्रास जिल्हाधिकारी नयना गुंडे यांनी भेट देऊन महिला
बचतगटाद्वारे तयार करण्यात आलेल्या उत्पादनाची पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी यांनी
महिला बचतगटाच्या वस्तूंच्या उत्पादनाचा दर्जा व गुणवत्तेबाबत समाधान व्यक्त करुन सदर दर्जेदार
उत्पादनाची ग्राहकांनी खरेदी करावी असे आवाहन केले.
शितला माता मंदिर चौक, सिव्हील लाईन, गोंदिया येथे उत्कर्ष लोकसंचालित साधन केंद्रात
महिला बचतगटाद्वारे तयार करण्यात आलेले खाद्य पदार्थ, मास्क, कापडी पिशव्या, तयार कपडे,
विविध प्रकारचे मसाले, तिखट, लोणचे, पापड, कुरोड्या, शहद, शोभेच्या लाकडी व बांबूच्या वस्तू,
फोटो फ्रेम, भेट वस्तूचे साहित्य विक्रीस उपलब्ध आहेत.
यावेळी नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक निरज जागरे, महिला आर्थिक विकास महामंडळाचे
जिल्हा समन्वय अधिकारी संजय संगेकर व लोक संचालित साधन केंद्राचे कर्मचारी उपस्थित होते.