भारत हा औषधी वनस्पतीचा खजिना :अति.मुकाअ डॉ. लोखंडे

0
163

गोंंदिया,दि.११-भारत हा औषधी वनस्पतींचा खजिना आहे. अनेक रोग आणि आजारांना कोणत्याही दुष्परिणामांशिवाय बरे करण्याची क्षमता वनस्पती औषधीमध्ये असल्याने प्राचीन काळापासून भारतीय विविध प्रकारच्या औषधी वनस्पतींचा वापर करीत आहेत.त्यामुळै औषधी वनस्पती वाढवणे ही आजची गरज आहे, असे प्रतिपादन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.तानाजी लोखंडे यांनी केले.

तालुक्यातील शिवणी येथील आयुष आयुर्वेदिक रुग्णालयाच्या भेटी दरम्यान ते बोलत होते. यावेळी जिल्हा आयुष अधिकारी डॉ.मिना वट्टी, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रकल्प अधिकारी आनंदराव पिंगळे, आरोग्य विभागाचे जिल्हा साथरोग अधिकारी डॉ.निरंजन अग्रवाल प्रामुख्याने उपस्थित होते. प्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रेमकुमार बघेले यांनी आयुर्वेदीक दवाखाना आणि आयुष्मान आरोग्य मंदीरातील आरोग्य विषयक व हर्बल गार्डनची माहिती अधिकार्‍यांना दिली. तसेच डॉ. तानाजी लोखंडे यांनी रुग्णालयातील आयुष पध्दत व हर्बल गार्डनचे कौतुक करुन डॉ. प्रेमकुमार बघेले व त्यांच्या आरोग्य पथकाचे अभिनंदन केले. यावेळी ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी व गावकरी उपस्थित होते.

आहे