41.3 C
Gondiā
Saturday, June 13, 2026
Home विदर्भ अदानी फाउंडेशनचा उपक्रम; सेजगावच्या जिप उच्च प्राथमिक शाळेत जागतिक हातधुवा दिन

अदानी फाउंडेशनचा उपक्रम; सेजगावच्या जिप उच्च प्राथमिक शाळेत जागतिक हातधुवा दिन

0
50

blank

तिरोडा, दि.16 : अदानी फाउंडेशन तिरोडाच्यावतीने सेजगाव येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत जागतिक हातधुवा दिवस आज शनिवार, 16 ऑक्टोबर रोजी साजरा करण्यात आला. यावेळी हात धुण्याची गरज व त्याचे परिणाम यावर मार्गदर्शन करण्यात आले.

अध्यक्षस्थानी सरपंच कंठीलाल पारधी होते. प्रमुख पाहुणे म्हणून अदानी फाउंडेशनचे हेड नितीन शिराळकर, तिरोडा पंचायत समितीचे माजी उपसभापती डॉ.किशोर पारधी, उपसरपंच स्वप्नील महाजन, एस.डी. पारधी, ग्रामपंचायत सचिव तुरकर, मुख्याध्यापक एस.एन. पटले, सर्व शिक्षकवृंद व विद्यार्थी उपस्थित होते.

यावेळी विद्यार्थ्यांनी प्रसंगाला अनुसरून आपले मनोगत व्यक्त केले. काही विद्यार्थ्यांनी ड्रॉईंग सुद्धा काढली. तसेच विद्यार्थ्यांनी मूकनाट्य सादर करून हात धुणे गरजेचे का आहे? त्याचे परिणाम काय होतात? ते आपल्या अभिनयातून सादर केले. त्यानंतर हात धुण्याची अचूक पध्दत काय व काशी असते, याबाबत प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले.

व्यवसायाबाबत कार्यशाळा आयोजित करणार : नितीन शिराळकर 

याप्रसंगी अदानी फाउंडेशनचे हेड नितीन शिराळकर यांनी आपल्या वक्तव्यात आजच्या दिवसाचे महत्त्व विशद केले. तसेच विद्यार्थ्यांनी भविष्यात काय करावे, गावातील लोकांनी आपली आर्थिक उन्नतीसाठी छोटे व्यवसाय करणे गरजेचे आहे. त्यासाठी अदानी  फाउंडेशन तशा प्रकारची कार्यशाळा आयोजित करुन त्यांना मदत करेल, असे आश्वासित केले.

विद्यार्थ्यांचा गौरव : अदानी फाउंडेशनचा उपक्रम

ज्या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले, ड्रॉईंग कॉम्पिटिशनमध्ये ज्यांनी सहभाग घेतला व मूकनाट्यमध्ये ज्यांनी अभिनय केले, अशा सर्व विद्यार्थ्यांना अदानी फाउंडेशनतर्फे बक्षीस देऊन त्यांना गौरविण्यात आले.

प्रास्ताविक एस.एन. पटले यांनी मांडले. त्यात त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे औचित्य विशद केले. संचालन अरविंद उके यांनी केले. आभार अदानी फाउंडेशनचे राहुल शेजव यांनी मानले. कार्यक्रमासाठी स्वप्नील वाहने, मनोज रहांगडाले, प्रकाश भालेराव, आर.आर. बिसेन, एस.सी. रहांगडाले, पी.बी. पटले व व्यवस्थापन समितीने सहकार्य केले.