42.4 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home Featured News गडचिरोली जिल्ह्यात ५०हून अधिक ठिकाणी रावण पूजन

गडचिरोली जिल्ह्यात ५०हून अधिक ठिकाणी रावण पूजन

0
46

blank

गडचिरोली-हिंदू संस्कृती मध्ये रावणाला दुष्ट प्रवृत्तीचा मानून त्याचे दहन केले जाते. तर आदिवासी गोंड संस्कृतीत काही ठिकाणी रावण हा आदिवासींचा पूर्वज मानत पूजा केली जाते. गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी समुहामध्ये रावण पूजनाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढतांना दिसून येत आहे. यावर्षी शुक्रवारला दसऱ्याच्या दिवशी गडचिरोली जिल्ह्यात जवळजवळ ५० हून अधिक स्थानांवर पहादी पारी कुपार लिंगो गोंडी धर्म महासंघाचे व त्याचे संलग्नित समित्यांचे वतीने गोंडराजा सम्राट रावण संबोधून पूजन करण्यात आले.

जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील परसवाडी गावात ३० वर्षापूर्वी १९९१ साली मोतीरावण कंगाली यांनी रावण पूजेची सुरूवात केली. कालांतराने तिथे रावणाचे मंदिर उभारले गेले. येथे दरवर्षी नवरात्रीच्या आरंभापासून नऊ दिवस रावणाची पूजा केली जाते. तर मंदिरात दररोज पूजन केले जाते. गोंडी धर्म महासंघाचे रावणाला आदिवासी गोंड समाजाचे पूर्वज असल्याचे सांगतात. ते सम्राट रावणाचे आडनाव मडावी असल्याचेही सांगतात.

blank

परसवाडीसह जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील कमलापूर कोडसेलगुडम या आदिवासीबहुल गावात रावण पूजनाची मोठी परंपरा आहे. दसऱ्याच्या दिवशी सम्राट रावणाची मिरवणूक काढून नंतर पूजन केले जाते. तर सायंकाळी हिंदू संस्कृतीनुसार रावणाचे दहन केले जाते. दोन्ही कार्यक्रम शांततेत पार पडतात हे विशेष.

कुरखेडा तालुक्यातील मालदुगी येथे रावणाची मोठी पुजा केली जाते. ही परंपरा मागिल २४ वर्षांपासून सुरू आहे. यावर्षीसुध्दा येथे पूजनाचा कार्यक्रम करण्यात आला. या प्रमुख उल्लेखनीय कार्यक्रमांसह मालेवाडा, मोहगांव, डोंगरगाव, बेलगांव खैरी, रानवाही, सोनपूर, चांदोना टोला, महावाडा, पिपरटोला, नरोटी चक, रांगी, कन्हाळगाव, येरकड टोला, एटापल्ली, पोटेगाव, पेंढरी,  पेरमिली इलाक्यातील बांडेनगर, चामोर्शी तालुक्यातील अड्याळ, माडे आमगाव  सह अन्य गावांचा समावेश आहे.

blank

काही चे मते रावण हा आर्य आणि अनार्य या दोन संस्कृतींचा संगम असल्याचे म्हटले आहे. रावणाचे वडील विश्रवा हे पुलत्स्य ऋषींचे पुत्र होते. तर आई ही अनार्य संस्कृतीमधील होती. कैकसी असे तिचे नाव. त्यांचेपासून रावण आणि कुबेर हे दोन पुत्र झाल्याचे दाखले मिळतात. रावण हा स्वतंत्र राजा तर कुबेर हा देवांचा खजिनदार म्हणून ओळखला जातो. या अर्थाने रावण हा आर्य-अनार्य संस्कृतीच्या मिलनातून जन्माला आला. आणि रावणाने आपल्या अनार्य मातृ संस्कृती ‘रक्ष’ चे पालन केले. त्यामुळे आदिवासी समुह रावणाला आपला पूर्वज मानतात.

blank