
‘त्या’ 52 स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या पाठीशी नगरवासी
चिचगड,दि.20- देश संकटकाळात असताना आपल्या शहरातील आरोग्य अबाधित राहावे, यासाठी अहोरात्र झटणाऱ्या त्या 52 सफाई कामगारांवर ऐन दिवाळीच्या तोंडावर नगर प्रशासनाने बेरोजगारीची कुऱ्हाड चालविली. गेली अनेक वर्षे शहराला घाणीपासून दूर ठेवून नागरिकांचे आरोग्य जपले त्या अपार कष्ट उपसणाऱ्या कामगाराच्या मुलाबाळांना या दिवाळीत उपाशी वा अर्धपोटी राहण्याची दुदैवी वेळ लालफिताशाहीमुळे ओढवली आहे. परिणामी, ‘कागदी घोडे नाचविणाऱ्यांना सुभेदारी, तर कष्टकऱ्यांच्या नशिबी कायम उपेक्षा’ हे वाक्य आजमितीला प्रत्येक देवरीकरांच्या ओठी नाचत आहे. देवरी नगरप्रशासनामधील घाणेरड्या राजकारणाची ही परिणती असल्याची चर्चा देखील शहरात आहे.
सविस्तर असे की, देवरी नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी गेल्या १८ तारखेला देवरी नगरपंचायत मुख्याधिकारी, उपविभागीय अधिकारी देवरी, देवरी पोलिसासमोर त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायाविरोधात आपल्या मागण्या निवेदनाच्या स्वरुपात माडंल्या. त्यामध्ये गेल्या अनेक वर्षापासून कार्यरत असलेस्या स्वच्छता कर्मचाऱ्यांची शासन निर्देशीत राशी त्यांच्या बँक खात्यात जमा करणे, स्वच्छता कर्मचाऱ्यांना दर दिवसी स्वयं रक्षणाकरिता सुरक्षा कीट देण्यात देणे, स्वच्छता कर्मचाऱ्यांचा प्राविडंट फंड त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात करणे, स्वच्छता कर्मचाऱ्यांचे सुपर वायजर असलेले काणेकर यांना सुपरवायजर पदावरुन हटविणे, स्वच्छता कर्मचाऱ्यांना आरोग्य सुविधा पुरविणे, नगरपंचायतच्या कोणत्याही माजी नगरसेवकांनी स्वच्छता कर्मचाऱ्यांवर दबाव त्यांच्या कामात बाधा आणण्यापासून रोखणे, स्वच्छता कर्मचाऱ्यांना दिलेल्या वेतनाची सखोल चौकशी करणे अशा रास्त मागण्यांचा निवेदनात समावेश होता.
सदर प्रकरणाची लेखी तक्रार स्वच्छता कर्मचाऱ्यांनी देवरी पोलिसस्टेसनला सुद्धा दिली. परंतु, त्या लेखी तक्रारीवर आठवडा लोटूनही कोणतीही चौकशी करण्यात आलेली नाही. देवरी शहराचे देवदूत समाजल्या जाणाऱ्या व कोरोना काळात रात्रंदिवस राबणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांचा अनेक सामाजिक संस्था व जनप्रतिनिधीकडून स्वागत-सत्कार ही करण्यात आले. आता त्याच कर्मचाऱ्यांवर आज देवरी नगरप्रशासनाने संबंधित कंत्राटदाराशी संगनमत करून कोणतीही अग्रीम नोटीस न बजावता सरसकट कामावरून काढून टाकले. या 52 कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांवर ऐन दिवाळीच्या सणाला उपासमारीची वेळ आली आहे. नगरप्रशासनाच्या या कार्यवाही विरोधात देवरी शङरात कमालीचा असंतोष आहे.
देवरी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांच्या सोबत स्वच्छता कर्मचाऱ्यांना या विषयी विचारणा केली असता त्यांनी आपले हात झटकण्याचा प्रयत्न केला. त्या ५२ स्वच्छता कर्मचाऱ्यांना दि. १८ ऑक्टोबंरला सायंकाळी ७ वाजता नगरपंचायतीला बोलावून. मुख्याधिकारी स्वतः गैर हजर असल्याच दिसून आले. स्वच्छता कर्मचाऱ्यांनी दुरध्वनीवरून मुख्याधिकारी यांना विचारणा केली असता ठेका रद्द केल्याने तुम्हाला कामावर येण्याची गरज नसल्याचे त्यांनी कर्मचाऱ्यांना सांगण्यात आले.
देवरी नगरपंचायतीच्या त्या ५२ ही स्त्री व पुरुष कर्मचाऱ्यांवर झालेल्या अन्यायामुळे अनेक राजकीय पक्षानी व शहर वाशीयाकडून स्वच्छता कर्मचाऱ्यांना न्याय मिळेपर्यंत (समर्थन) राहणार असल्याचे सांगितले आहे. जर नगरपंचायतीच्या या स्वच्छता कर्मचाऱ्यांना दोन दिवसात पूर्वरत कामावर रुजू न केल्यास प्रशासनाविरुद्ध तीव्र आंदोलन छेडण्याची इशारा देखील यावेळी देण्यात आला आहे. गोंदिया जिल्ह्याचे जिल्हाधिकारी याविषयासंबंधाने काय निर्णय घेतात, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.





