31.2 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home Top News एकाच जिल्ह्यात दोन दिवसात 3 शेतकऱ्यांची आत्महत्या

एकाच जिल्ह्यात दोन दिवसात 3 शेतकऱ्यांची आत्महत्या

0
39

blank

बीड | दोन दिवसांमध्ये 2 तरुण शेतकऱ्यांसह एका वृद्ध शेतकऱ्यानी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत. जिल्ह्यातील केज, वडवणी, परळी या तालुक्यात प्रत्येकी एका शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे.

बाळासाहेब रामलिंग गित्ते याने 19 तारखेला आत्महत्या केली. तर सिद्धेश्वर धर्मराज फरताडे याने काल 20 तारखेला सकाळी व नागोराव धोंडिबा शिंदे यांनी काल सायंकाळी उशिरा आत्महत्या केली.

बीड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे होत्याचं नव्हतं झाल्याने, शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. अतिवृष्टीने मराठवाड्यात सर्वाधिक नुकसान बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं झालं आहे. मात्र अद्यापही शेतकऱ्यांच्या पदरी शासनाची मदत पोहोचली नाही.

आता रब्बीचा हंगाम सुरू होत आहे, यामुळे आता येणारा सणवार कसा करावा ? घेतलेलं कर्ज कुठून फेडावं ? रब्बीसाठी बियानं कुठून आणावं ? वाहून गेलेलं शेत पुन्हा कसदार कसं बनवावं ? या एक ना अनेक संकटाने इथला शेतकरी चिंताग्रस्त झालेला आहे.

blank