32.7 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home विदर्भ  महिला किसान दिवस उत्साहात साजरा

 महिला किसान दिवस उत्साहात साजरा

0
29

गोंदिया,दि.27 : कृषि विभाग व आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने 22
ऑक्टोबरला पंचायत समिती सभागृह गोंदिया येथे प्रभारी जिल्हा अधिक्षक कृषि
अधिकारी प्रणाली चव्हाण यांचे अध्यक्षतेखाली महिला किसान दिवस साजरा
करण्यात आला. यावेळी तालुका कृषि अधिकारी धनराज तुमडाम व प्रगतशील महिला
शेतकरी तथा सामाजिक कार्यकर्त्या सविता बेदरकर उपस्थित होते.

प्रारंभी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी व प्रगतशील महिला शेतकरी
यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करुन व दीप
प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

यावेळी प्रणाली चव्हाण यांनी महिलांना उद्योजक कसे होता येईल
याबाबत विस्तृतपणे मार्गदर्शन केले. तसेच प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न
प्रक्रिया उद्योग योजनेबद्दल माहिती देऊन योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
केले.

सविता बेदरकर यांनी महिलांना शेतीसोबत कशाप्रकारे उद्योग करुन
महिला उद्योजक होता येईल यावर आपले मार्गदर्शन करुन आपले अनुभव कथन केले.

धनराज तुमडाम यांनी कृषि विभागाच्या विविध योजनांबद्दल
विस्तृतपणे माहिती देऊन महिलांना कशाप्रकारे लाभ घेता येईल याबद्दल
सांगितले.

सदर कार्यक्रमात महिला उद्योजक कसे होता येईल याकरीता केंद्र
शासनाची प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग या योजनेवर विशेष भर
देऊन जिल्हा संसाधन व्यक्ती भवदिप सहारे यांनी सदर योजनेबद्दल सविस्तर
मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे नियोजन तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक सुनिल खडसे,
सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक शैलेश बिसेन, मंडळ कृषि अधिकारी श्री
कल्लेवार व श्री नंदनवार, कृषि पर्यवेक्षक श्री हरिणखेडे, श्री मेंढे व
श्री कुंभारे यांनी केले. कार्यक्रमाला महिला कृषि सहाय्यक व तालुक्यातील
महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे संचालन तालुका
तंत्रज्ञान व्यवस्थापक सुषमा शिवणकर यांनी केले, तर उपस्थितांचे आभार
तालुका कृषि अधिकारी धनराज तुमडाम यांनी मानले.