34.8 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home गुन्हेवार्ता जिमलगट्टानजीक ट्रॅक्टर उलटल्याने दोन ठार

जिमलगट्टानजीक ट्रॅक्टर उलटल्याने दोन ठार

0
54

blank

अहेरी- देचली वरून छल्लेवाडाला जाणाऱ्या ट्रॅक्टर खड्ड्यात पडून उलटल्याने ट्रॅक्टर वरील दोन इसम ठार झाल्याची घटना आज सकाळी जिमलगट्टा पासून 2 किमी वर देचली रोड वर घडली आहे. ठार झालेल्या इसमांची नावे सुनील महेश अटकर रा.रसपल्ली व ट्रॅक्टर चालक अंकीत सिडाम रा.कोडसेलगुडम असे असून.ट्रॅक्टर मालक हा तेलंगाणा मधील असल्याची माहिती आहे.
आज सकाळच्या सुमारास देचली येथे शेतीच्या कामावर असलेल्या फार्मर्ट्रक कंपनीचा ट्रॅक्टर काम आटोपून निघाला होता. जिमलगट्टा पासून 2 किमी अलीकडे असताना ट्रॅक्टर चालकाचे संतुलन जाऊन खड्ड्यात पडून उलटला त्यामुळे ट्रॅक्टर चालक अंकित सिडाम व सुनील अटकर ट्रॅक्टर च्या खाली दबल्या गेले.त्यामुळे दोघंचा मृत्यू झाला आज सकाळच्या सुमारास देचली येथे शेतीच्या कामावर असलेल्या फार्मर्ट्रक कंपनीचा ट्रॅक्टर काम आटोपून निघाला होता. जिमलगट्टा पासून 2 किमी अलीकडे असताना ट्रॅक्टर चालकाचे संतुलन जाऊन खड्ड्यात पडून उलटला त्यामुळे ट्रॅक्टर चालक अंकित सिडाम व सुनील अटकर ट्रॅक्टर च्या खाली दबल्या गेले.त्यामुळे दोघंचा मृत्यू झाला.जिमलगट्टा येथील पोलिसांनी घटनास्थळी पोहोचुन घटनेचा पंचनामा केला आहे.

blank