
गोंदिया,दि.31ः गोंदिया शहरात बर्याच दिवसापासून निराश्रित अवस्थेत भटकत असलेल्या निर्मला बाई रेवा कनोजे (वय 70)यांची माहिती परदेशी बढई समाज सेवाभाई संस्थेच्या पदाधिकार्यांना मिळताच तिच्या मदतीला धाऊन गेले.त्यानंतर त्या महिलेवरऔषधोपचार करुन तिच्यापासून 25 वर्षाअगोदरच दूर झालेल्या मुलाचा शोध घेत भेट घडवून आणल्याने या सदस्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.तर एका 70 वर्षीय आईला तब्बल 25 वर्षानंतर आपला मुलगा मिळाल्याने ती सुध्दा सुखावल्याचे चित्र बघावयास मिळाले.
निराश्रित अवस्थेत भटकत असल्याने तिला काम सुद्धा करता येत नव्हते मिळेल तिथे खाणे आणी कुठेही आश्रयाने राहणे अशी तिची दिनचर्या होती.दयनीय अवस्थेत जिवन जगत होती. तिचा एक मुलगा राजु हा सुध्दा 25 वर्षापुर्वीच सोडून गेला होता. तो कुठे राहतो काय करतो हे सुद्धा निर्मला बाईला माहीत नव्हते. तेव्हा परदेशी बढई समाज सेवाभावी संस्था गोंदिया येथील उमाकांत सरोदे सचीव आणी गणेश जांगडे (संस्थापक) यांनी वेळीच दखल घेऊन तिला केंद्र प्रशासक सखी केंद्र गोंदिया येथील गुलशनी केरकेट्टा आणी समीना खान याचे सोबत चर्चा करून तिला सखी केंद्र गोंदिया येथे दाखल करून घेतले. व पुढील औषधोपचार करीता के. टी. एस. दवाखान्यात भर्ती केले. यानंतर सदर महीलेचा मुलगा राजेश रेवा कनोजे हा नागपुरला राहत असल्याची माहिती परदेशी बढई समाज सेवाभावी संस्था गोंदिया येथील पदाधिकार्यांना मिळताच, त्याचे सोबत फोन वर संपर्क साधुन गोंदिया येथे आई बद्द्ल सांगीतले. राजेश कनोजे आणी नातेवाईक सुनील सरोदे हे गोंदिया येथे आलेवर परदेशी बढई समाज सेवाभावी संस्था गोंदियाचे उमाकांत सरोदे सचीव, गणेशजी जांगडे, डाॅ. प्रकाश नागपुरे उपाध्यक्ष, देवीदास खळोदे आणि सखी केंद्र गोंदिया येथील महीला अधीकारी गुलशनी केरकेट्टा, समीना खान आणी त्यांचे संपुर्ण टिमच्या पुढाकाराने अखेर 25 वर्षी नंतर आई सोबत मुलगा राजेशची भेट घडवुन आणली.
निर्मला बाईची संपुर्ण देखभाल सखी केंद्रच्या गुलशनी केरकेट्टा आणी समीना खान हे करीत आहेत सध्या महीलेची प्रकृती चांगली आहे





