32.1 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home Top News खंडणी मागणाऱ्या तोतया नक्षल्यास अटक

खंडणी मागणाऱ्या तोतया नक्षल्यास अटक

0
34

blank

गडचिरोली, :दि.२८: नक्षलवादी असल्याचे सांगून दारुविक्रेत्यांकडून खंडणी मागण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका तोतयास मरपल्ली पोलिसांनी अटक केली आहे. शत्रू दुर्गम असे या तोतयाचे नाव असून, तो मरपल्ली येथील रहिवासी आहे.

त्याचे झाले असे की, काल मरपल्लीनजीकच्या सुद्धागुडम(उमानूर) येथील पोचम कुमरी यांच्या घरी तेरवीचा कार्यक्रम होता. त्यावेळी शत्रू दुर्गम हा तेथे गेला. त्याच्यासमवेत अन्य दोघेजणही होते. हे तिघेही वंगा गावडे व बंडे गावडे यांच्या घरी गेले. त्यांना झोपेतून उठवून गावात दारु कोणकोण विकतो, असे विचारुन त्यांच्याकडे नेण्याचे फर्मान सोडले. पुढे हे सर्वजण पोचम दोंतुलच्या घरी गेले. मात्र त्याच्या घराला कुलूप होते. त्यानंतर त्यांनी पोचमचा सासरा पोचम संपतच्या घराकडे आपला मोर्चा वळविला. त्यांना शत्रू व त्याच्या सहकाऱ्यांनी जंगलात सर्वाना दोन तास फिरवून दारुविक्रेत्यांबद्दल माहिती विचारली. त्यानंतर त्यांनी गावात येऊन पोचमच्या घराचे कुलूप तोडले. त्यानंतर त्यांनी गावातील मोठा मनुष्य कोण असे विचारुन विष्णू गेडाम यांच्या घराकडे आगेकूच केली. त्यांना १० लाख रुपयांची मागणी केली. बघताबघता गावातील लोक गोळा झाले. शत्रू दुर्गम हा दारु पिऊन असून, तो मरपल्लीचा रहिवासी असल्याचे नागरिकांच्या लक्षात आले. त्यांनी त्यास पोलिसांच्या हवाली केल्यानंतर पोलिसांनी त्यास अटक केली.

blank