40.6 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home Top News अमृता फडणवीसांसोबत फोटोत दिसणारी ‘ती’ व्यक्ती ड्रग्ज पेडलर; नवाब मलिकांच्या दाव्याने खळबळ

अमृता फडणवीसांसोबत फोटोत दिसणारी ‘ती’ व्यक्ती ड्रग्ज पेडलर; नवाब मलिकांच्या दाव्याने खळबळ

0
132

blank

मुंबई | आर्यन खान केसपासून राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी खळबळजनक दाव्याचा सपाटा लावला आहे. समीर वानखेडेंविरोधात अनेक गौप्यस्फोट केल्यानंतर नवाब मलिकांनी त्यांचा मोर्चा आता भाजपकडे वळवला आहे. नवाब मलिकांनी सकाळीच ट्विट करत अमृता फडणवीस आणि देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला आहे.

चलो आज बीजेपी और ड्रग्ज पेडलर के रिश्तों पे चर्चा करते है म्हणत नवाब मलिकांनी अमृता फडणवीस आणि एका व्यक्तीचा फोटो शेअर केला आहे. ही व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून ड्रग्ज पेडलर जयदीप राणा असल्याचा दावा नवाब मलिक यांनी केला आहे. नवाब मलिकांनी राजकीय विश्लेषकाच्या ट्विटचा आधार घेत भाजपवर निशाणा साधला आहे.

नवाब मलिक यांनी शेअर केलेल्या फोटोमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. अमृता फडणवीस यांच्या फोटोसोबतच नवाब मलिकांनी देवेंद्र फडणवीस यांचा आणि जयदीप राणाचा फोटोही शेअर केला आहे. त्यामुळे समीर वानखेडे पाठोपाठ आता देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस मलिकांच्या रडारवर आले आहेत.

नवाब मलिकांनी कालही पत्रकार परिषद घेत देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे निकटवर्तीय नीरज गुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर मलिकांनी सकाळी हे स्फोटक ट्विट करत खळबळ उडवून दिली. ट्विटनंतर थोड्या वेळातच अजून एक पत्रकार परिषद घेत धक्कादायक खुलासे केले आहेत.

Image

blank