
सौंदड रेल्वे : दिन दिन दिवाळी , गाय म्हशी ओवाळी ,ईडा पिडा टळू दे गो धन वाढू दे अन सुख समृद्धि नांदू दे अशी आदिवासी देव खिला मुठवा ला विनवणी करित लिंगो जंगो – स्त्री पुरुष ( लाठी काठी – सल्ला गांगरा – माता पिता – धन ऋण ) प्रतिक “ढाल ” ची ईडा पिडा टळू दे ,सुख समृद्धि नांदू दे म्हणत मनोभावे मानता करित आखरावर शेणाचा डुंगा (शुभा) करून विधीवत पुजा करून त्यात कोंबडी चे पिल्लु व अंडा ठेवुन प्रकृति शक्ति प्रतिक गायगोधन बांधण्याची प्रथा परंपरा वर्षानुवर्षा पासुन गुराख्याचे काम करणा-या त्या आदिवासी गोवारी जमातीतील नवयुवक आबाल वृद्ध स्त्रि पुरुष सगा सोयरे एकत्रितपणे प्रमुख गुराख्याच्या नेतृत्वात गावक-यांच्या साक्षिने जय सेवा ,जय खिला मुठवा व प्रकृति शक्ति चा जय जय कार करित मोठ्या घेराच्या डफरी वादयाच्या तालावर बिरवे म्हणत बेधुंद पणे गोवारी नृत्य करित संपुर्ण जिल्ह्यात ठिकठिकाणी पारंपरिकरित्या उत्साहात गाय गोधन साजरा करण्यात आला.
पशुधनावर शेती व्यवसाय अवलंबुन होता त्यामुऴे पशुधनाला अनन्य साधारण महत्व आहे पशुधनाचे संगोपन पालन पोषण जरी शेतकरी बांधव करित असला तरी गो धनाला रानावणातुन चारायला नेवुन त्याची राखण करण्याचे काम आपल्या नावाला सार्थक ठरवित आदिवासी गोवारी जमातीचे लोक फार पुर्वीपासुन करित आहेत
अलिकडे पशुधन कमी झाले असले तरी तरी परंपरे प्रमाणे गाय गोधन भरविणे कमी झाले नाही सालाबादा प्रमाणे ढाल गोधनावर आणणे, गार्यगोधनाची पुजा झाली की लगेचच बिरवा म्हटल्या जाते व डफरी मोठ मोठ्यांनी वाजवत गोवारी नृत्याला सुरूवात होते त्यांचे बेधुंद नाचणे गावक-यांना आकर्षीत करते गावकरी मनशोक्त आनंद लुटतात अन बोजारा देतात तर सर्व आदिवासी गोवारी जमातीचे लोक ” गोवारी नृत्य” करित गावभर फिरतात .असा गाय गोधन काल सौंदड रेल्वे येथे बिरवा शाहिर पतिराम कोहळे ,सामाजिक कार्यकर्ते दामोदर नेवारे, , सुरेश कोहळे, जगण नेवारे,निलकंठ कोहळे भरत कोहळे ,प्रभु कोहळे , रविन्द्र राऊत, जगण वाघाडे किरण कुशराम , राजेश कोहळे , मंगेश कोहळे , प्रमोद कोहळे , मंगेश ठाकरे , प्रशांत कोहळे रामलाल ठाकरे , संदिप कोहळे ,व गावक-यांच्या उपस्थितित साजरा करण्यात आला





