33.9 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home क्रीडा धानला येथील अखाड्यात मुलींनी मारली बाजी

धानला येथील अखाड्यात मुलींनी मारली बाजी

0
45

blank

मौदा,दि.06ः- कुस्ती म्हटलं की हा पुरुषी खेळ. अनेक वर्षांपासून या खेळावर पुरूषांची मक्तेदारी राहिली आहे. या रागंडी खेळाचे क्षेत्रही महिलांनी पादाक्रांत केले आहे. मौदा तालुक्यातील श्रावणी राजू वैद्य हिने (14) धानला येथे झालेल्या आमदंगलमध्ये पुरूषांची मक्तेदारी मोडीत काढत यश मिळवले आहे.

दिवाळी पाडव्याच्या भाऊबीज निमित्ताने ग्रामीण भागात मंडई भरवली जातो. यात दंडार, अखाडा (आमदंगल) इत्यादी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. यातच धानला येथे सुद्धा या मंडईच्या निमित्ताने आयोजित आमदनगलमध्ये राज्यस्तरीय ग्राम्पलिंग कुस्तीपटु श्रावणी राजू वैद्यने, सिल्ली (कुही) येथील मुलाला कुस्तीत चित करून यश मिळवले. तिला मंडळाच्यावतीने कपाट हे बक्षिस म्हणून देण्यात आले.यावेळी मंचावर कामठी मौदा क्षेत्राचे आमदार टेकचंद सावरकर, जिल्हा परिषद कृषी सभापती तापेश्वर वैद्य, तालुका काँग्रेस अध्यक्ष ज्ञानेश्वर वानखेडे, उपसरपंच रमेश चव्हाण आदी मंडळी होती.

blank