33.9 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home Top News “लाज लज्जा असेल तर कंगणाने देशाची माफी मागावी”

“लाज लज्जा असेल तर कंगणाने देशाची माफी मागावी”

0
74

blank

मुंबई | अभिनेत्री कंगणा राणावत पुन्हा एकदा आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे. तिने देशाच्या स्वातंत्र्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी कंगणा राणावतला तिच्या वक्तव्यावरून खडेबोल सुनावले आहेत. यावेळी राऊतांनी तिला “कंगणाबेन” असं संबोधत खोचक टोला लगावला आहे.

संजय राऊत यावेळी बोलताना म्हणाले, भाजपने कंगणाबेनने केलेल्या वक्तव्यावर आपली भूमिका स्पष्ट करावी. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. कंगणा भाजपची भाषा बोलत असल्याचा आरोप तिच्यावर याआधी अनेकवेळा केला होता. याच मुद्द्याला अनुसरून संजय राऊतांनी भाजपला हा टोला लगावला आहे.

ते पुढे म्हणाले, “कंगणाला असं वक्तव्य करायची सवयच आहे. मात्र, तिने यावेळी देशाचा अपमान केला आहे. तिने तिच्या वक्तव्यामुळे भारतीयांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे कंगणाने देशवासियांची माफी मागावी आणि कंगणाला आत्तापर्यंत मिळालेले सर्व पुरस्कार मागे घ्यावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे.संजय राऊतांशिवाय अनेकांनी कंगणाच्या वक्तव्यावर निशाणा साधला आहे. भाजप नेते वरूण गांधी यांनीही एक व्हिडीओ शेअर करून कंगणाला चांगलंच खडसावलं आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे, या विचारांना देशद्रोह म्हणावा कि वेडेपणा, असा घणाघात त्यांनी केला आहे.

“कंगणाला दिलेला पद्मश्री पुरस्कार परत घ्या”

नाशिक | सतत आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असणारी अभिनेत्री कंगणा राणावतने पुन्हा एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. 1947 चे स्वातंत्र्य भीक मागून मिळालं, खरं स्वातंत्र्य 2014 ला मिळालंय, असं खळबळजनक वक्तव्य कंगणाने केलं होतं. त्यानंतर आता देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसने कंगणा विरोधात आक्रमक भूमिका घेत कंगणाने स्वातंत्र्य सैनिकांंचा अपमान केला असून तिचा पद्मश्री पुरस्कार परत घेण्यात यावा, अशी विंनती केली आहे. नाशिक येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी राष्ट्रपतींना पत्र लिहून ही मागणी केली आहे.

त्यांनी पत्रात म्हटलं आहे, “कला क्षेत्रात केलेल्या कामगिरीमुळे श्रीमती कंगणा राणावत यांना आपल्या हस्ते पद्मश्री पुरस्कार देण्यात आला होता. कला क्षेत्र वगळता श्रीमती कंगणा राणावत नको त्या ठीकाणी आपले नाक खुपसून प्रसिद्धी झोतात राहण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळेच त्यांना ट्वीटरनेही बॅन केले होतं” असं पत्रात म्हटलं आहे.

पुढे म्हटलं आहे, कंगणा राणावत यांनी प्रसारमाध्यमांसमोर असं वक्तव्य करून स्वातंत्र्यसैनिकांचा अपमान केला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे महात्मा गांधी, भगत सिंग, चंद्रशेखर आझाद यांचा अपमान झाला आहे. त्यामुळे कंगणा राणावत यांचा पद्मश्री पुरस्कार परत घेऊन त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी पत्रातून केली आहे.

blank