सडक अर्जुनी –तालुक्यातील वनपरिक्षेत्र जांभळी अंतर्गत डब्वा बिट कम्पार्टमेंटमध्ये अस्वल मृत आढळल्याची घटना शुक्रवार 19 नोव्होंबर रोजी उघडकीस आली. अस्वलाचा मृत्यू नैसर्गिक असल्याचे वन विभागाच्या अधिकार्यांचे म्हणणे आहे.
येथील वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय अंतर्गत येणार्या वनक्षेत्र कार्यालय दोडके जांभळी अंतर्गत डब्वा बिटातील कंपार्टमेंट क्रमांक 559 मध्ये दोन दिवसापूर्वी एका अस्वलाचा नैसर्गिक मृत्यू झाला. याची माहिती वन विभागाला मिळताच गोंदियाचे वन अधिकारी प्रदीप पाटील, वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील मडावी, वनक्षेत्र अधिकारी युवराज ठवकर, वनरक्षक विजय आडे, संजय चव्हाण, तरुण बेलकर, वनमजूर उद्धव गायकवाड, चैतराम खंडू, खाडवकर आदींनी घटनास्थळी जावून मृत अस्वलाचा पंचनामा केला. यानंतर पशुधन विकास अधिकारी श्रीकांत वाघाये पाटील यांनी उत्तरीय तपासणी केली. प्राथमिक अंदाजानुसार अस्वल वयस्क असल्यामुळे नैसर्गिक मृत्यू झाला असल्याचा अंदाज डॉ. वाघाये यांनी व्यक्त केला.




