
नवी दिल्ली-2021 वर्ष संपायला एक महिना बाकी असला, तरी नवीन वर्षाच्या आगमनाची जोरदार तयारी सुरू झाली आहे. 2022 हे वर्ष सुट्यांच्या दृष्टीने खूप खास असणार आहे. 2021 प्रमाणे 2022 मध्येही एकूण 42 सरकारी सुट्या मिळणार आहेत. काही सुट्या शनिवारी व रविवारी आल्या नसल्या, तर या सुट्यांचा आकडा आणखी वाढला असता.
2022 मध्ये 18 राजपत्रित सुट्या असतील. याशिवाय विश्रांतीसाठी प्रतिबंधित सुट्या असतील. प्रतिबंधित सुट्या म्हणजे अशा सुट्या ज्यात संस्थेचा मालक किंवा कोणतीही कंपनी कर्मचार्यांसाठी कार्यालय उघडू शकते. परंतु, सहसा या दिवशी बहुतेक कार्यालये बंद असतात. नववर्षाप्रमाणे वसंत पंचमी, लोहरी, जन्माष्टमी, रक्षाबंधन किंवा गुरुनानक जयंती या सर्वांचा समावेश प्रतिबंधित सुट्यांमध्ये केला जातो.
2022 मध्ये शनिवार-रविवारच्या दिवशी अनेक सुट्या येत आहेत. 2022 ची सुरुवात शनिवारपासून होत आहे. रविवारी 20 मार्च रोजी शिवजयंती असेल. अशा प्रकारे ईस्टर, गुड फ्रायडे, मोहरम, महात्मा गांधी जयंती, महर्षी वाल्मिकी जयंती, छठ पूजा, मिलाद-उन-नबी आणि ख्रिसमस हे सण आठवड्याच्या सुटीत येत आहेत. त्यामुळे वर्षभरात एकूण 12 सुट्या वाया जाणार आहेत.





