
नवी दिल्ली-गुरुवारी मायक्रो-ब्लॉगिंग साइट ट्विटरवर अनेक युजर्सच्या फॉलोअर्सची संख्या अचानक कमी झाली. यामध्ये सामान्य वापरकर्त्यांसह अनेक बडे सेलिब्रिटी आणि नेतेही सामील होते. युजर्सकडून ट्विटच्या माध्यमातून तक्रार करूनही याबाबत कंपनीकडून नवे धोरण जाहीर करण्यात आले नाही किंवा फॉलोअर्स कमी होण्याचे कारणही सांगण्यात आले नाही.
त्यामुळे ट्विटरवरच युजर्समध्ये वाद सुरू झाला. पराग अग्रवाल ट्विटरचे नवे सीईओ झाल्यानंतर कंपनीने जाणूनबुजून फॉलोअर्सची संख्या कमी केल्याचा आरोप युजर्सनी केला आहे. विरोधी पक्षांशी संबंधित अनेक नेत्यांनी आणि त्यांच्या समर्थकांनी याला पराग अग्रवाल आणि भाजपमधील मिलीभगत असल्याचे म्हटले आहे.
पुन्हा व्हेरिफिकेशन मॅसेज येत आहे
ज्यांनी त्यांचे फॉलोअर्स गमावले आहेत त्यांनी देखील तक्रार केली आहे की, त्यांना अकाउंट रिस्ट्रिक्टेड करण्याचा मॅसेज आला आणि पुन्हा व्हेरिफेक्शन करण्यास सांगण्यात आले. अकाउंट व्हेरिफाय केल्यानंतर फॉलोअर्सची संख्या आपोआप वाढेल, असा दावाही करण्यात आला. म्हणजेच, तुमच्या फॉलोअर्सचे जेवढे अकाउंट व्हेरीफाय होतील तेवढेच ते तुमच्या फॉलोअर्सच्या यादीत वाढतील.
पीएम मोदी आणि अमिताभ बच्चन यांच्या फॉलोअर्समध्येही घट झाली
यूजर्स सतत ट्विट करून याबाबत माहिती देत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राहुल गांधी यांच्यासह सर्व बड्या नेत्यांचे फॉलोअर्सही कमी झाल्याचे बोलले जात आहे. चित्रपट अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या फॉलोअर्समध्येही लक्षणीय घट झाली आहे.
माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची मुलगी शर्मिष्ठा यांनी त्यांचे जवळपास 3000 फॉलोअर्स कमी झाल्याची तक्रार केली, तर महिला लेखिका शेफाली वैद्य यांनी ट्वीट केले की, रात्री 9.37 ते 10.25 या दरम्यान तिने 800 फॉलोअर गमावले. दिल्लीतील काँग्रेसचे चार वेळा आमदार राहिलेले मुकेश शर्मा आणि अनेक सेलिब्रिटींनीही ट्विटमध्ये याबाबत तक्रार केली आहे.






